Mahabreaking

[breaking_news]

Nitesh Wankhade :नितेश वानखडे यांना पीएचडी पदवी; कांदा संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान

Nitesh Wankhade :नजीकच्या वणी (रंभापूर) येथील डॉ. नितेश जनार्दन वानखडे यांना वनस्पतीशास्त्र (बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान) या विषयात ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित ३९ व्या दीक्षांत समारंभात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.

Nitesh Wankhade
बोरगाव मंजू : नजीकच्या वणी (रंभापूर) येथील डॉ. नितेश जनार्दन वानखडे यांना वनस्पतीशास्त्र (बियाणे विज्ञान व तंत्रज्ञान) या विषयात ‘डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी’ (Ph.D.) पदवी प्रदान करण्यात आली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित ३९ व्या दीक्षांत समारंभात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
डॉ. वानखडे यांनी “बायोसिंथेसाइज्ड मेटल नॅनोपार्टिकल्सचा कांदा पिकाच्या बल्ब उत्पादन, दर्जेदार बियाणे निर्मिती व साठवणक्षमतेवर होणारा परिणाम” या विषयावर आपला शोधनिबंध सादर केला. त्यांनी हे संशोधन डॉ. व्ही. आर. शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करून गौरविण्यात आले.
सध्या डॉ. वानखडे हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कापूस संशोधन विभागात कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या यशाचे श्रेय त्यांनी कुटुंबीय, शिक्षकवृंद आणि विद्यापीठ प्रशासनाला दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top