Mahabreaking

[breaking_news]

Lonar Tehsildar :लोणार तहसीलदार ‘ॲक्शन मोड’वर; वाळू वाहतुकीवर कडक नजर, दिवसभर तपासणी मोहीम

Lonar Tehsildar :लोणार तालुक्यातील रेतीघाटांवरील गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत तहसीलदार भूषण पाटील यांनी थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये प्रवेश केला आहे. १७ मार्च रोजी बीबी–सुलतानपूर महामार्गावर दिवसभर तळ ठोकून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

Lonar Tehsildar

रेती घोटाळ्याच्या तक्रारीनंतर प्रशासन सतर्क; महामार्गावर वाहनांची झाडाझडती

रमेश खंडागळे

बीबी : लोणार तालुक्यातील रेतीघाटांवरील गैरप्रकारांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत तहसीलदार भूषण पाटील यांनी थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये प्रवेश केला आहे. १७ मार्च रोजी बीबी–सुलतानपूर महामार्गावर दिवसभर तळ ठोकून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात आली.

सावरगाव तेली आणि भुमराळा येथील रेतीघाटांवर नियम डावलून उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात दाखल झाल्यानंतर प्रशासन हलले. तत्काळ तपासणी पथकाची नियुक्ती करून कारवाईला सुरुवात करण्यात आली.

तपासणीदरम्यान पथकाने महामार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवत चालकांकडील चालान पावत्यांची पडताळणी केली. बहुतेक वाहनधारकांकडे वैध कागदपत्रे आढळली, मात्र काही वाहनांवर वाळू उघडी वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले.

यावर प्रशासनाने तत्काळ संबंधितांना जाब विचारत वाळू झाकण्यासाठी नेट खरेदी करण्याचे आदेश दिले. यापुढे नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.

या मोहिमेत कोणतीही मोठी नियमबाह्य वाहतूक आढळून आली नसली, तरी प्रशासनाची ही अचानक कारवाई रेतीमाफियांना इशारा मानली जात आहे.सदर तपासणी पथकात मंडळ अधिकारी के. एल. फोलाने, संतोष पनाड, महसूल अधिकारी ए. एस. सौदर तसेच संतोषराव देशमुख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top