Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Leopard Creates Panic :मोहाडी शिवारात बिबट्याचा थरार; नीलगायीवर हल्ला, वनविभाग मात्र सुस्त? 

Leopard Creates Panic :जवळच असलेल्या मोहाडी शिवारात बिबट्याचा मोकाट वावर वाढत असून शेतकरी वर्गात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार दिवसांपासून या भागात बिबट्या दिसत असल्याच्या घटना घडत असतानाही वनविभागाने ठोस पावले उचलली नसल्याची संतप्त चर्चा सुरू आहे. दरम्यान, रविवार (१५ मार्च) रोजी सकाळी सुमारे १० वाजता बिबट्याने एका नीलगायीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली.

Leopard Creates Panic

साखरखेर्डा  : जवळच असलेल्या मोहाडी शिवारात बिबट्याचा मोकाट वावर वाढत असून शेतकरी वर्गात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील चार दिवसांपासून या भागात बिबट्या दिसत असल्याच्या घटना घडत असतानाही वनविभागाने ठोस पावले उचलली नसल्याची संतप्त चर्चा सुरू आहे. दरम्यान, रविवार (१५ मार्च) रोजी सकाळी सुमारे १० वाजता बिबट्याने एका नीलगायीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली.मेहकर येथील वनविभागाच्या अधिकार्यांनी रविवारी जखमी निलगायीची पाहणी केली.

नीलगायीचा मोठ्याने हंबरडा ऐकू आल्याने शेतात काम करणारे गजानन बबन इंगळे आणि माजी सैनिक पुंजाजी इंगळे हे तातडीने घटनास्थळी धावले. तेथे पोहोचताच एक मादी बिबट्या आणि तिची दोन पिल्ले नीलगायीवर हल्ला करत असल्याचे भीषण दृश्य त्यांच्या नजरेस पडले. बिबट्याने नीलगायीला जबड्यात पकडून ठेवले होते. हे दृश्य पाहून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराट पसरली.

या घटनेत नीलगायीच्या पार्श्वभाग, पाठ व पोटावर नखांचे गंभीर घाव दिसून आले असून पोटावर मोठी जखम झाल्याने ती रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत पडली होती. घटनेची माहिती मिळताच मेहकर येथील वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नीलगायीची पाहणी केली.

दरम्यान, मोहाडी परिसरात मागील चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी गावालगतच्या तलाव परिसरात बिबट्या दिसून आला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी लाठ्या-काठ्या घेऊन त्याचा पाठलाग करून हाकलून लावल्याचे सांगण्यात येते.

उन्हाळ्याची चाहूल लागल्याने अनेक ठिकाणचे पाणवठे आटत चालले आहेत. मात्र मोहाडी परिसरात पाझर तलाव तसेच जवळच कोराडी धरण असल्याने या भागात पाणी व हिरवा चारा उपलब्ध आहे. त्यामुळे नीलगाई, हरणे, कोल्हे आदी वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून त्यांच्याच शिकारीसाठी बिबट्यांनी या भागाकडे मोर्चा वळविल्याचा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.

विशेष म्हणजे यापूर्वीही परिसरातील मौजे शिंदी येथे बिबट्याने माकडाची शिकार करून ते झाडावर लटकविल्याची घटना घडली होती. तसेच शिंदी शिवारात दोन कुत्र्यांची शिकार झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

रबी हंगाम सुरू असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतात काम करत असताना अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने मोहाडी परिसरात पथक पाठवून बिबट्याचा शोध घ्यावा आणि शेतकऱ्यांना भयमुक्त करावे, अशी जोरदार मागणी होत आहे.

यासंदर्भात बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शिवदास रिंढे यांनीही प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मोहाडी येथील पूर्वेकडील तलाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून आज नीलगायीची शिकार झाली आहे. शेतकरी शेतात काम करत असताना अशा घटना घडत असल्याने नागरिक भयभीत आहेत. वनविभागाने तातडीने कारवाई करून परिसर भयमुक्त करावा.”

एखादी मोठी जिवितहानी होण्यापूर्वीच वनविभागाने जागे होऊन परिस्थितीचा गांभीर्याने आढावा घ्यावा, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top