Mahabreaking

🔴 BREAKING
Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५ कोटी ,६४ लाख मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

Speeding Unidentified Vehicle :भरधाव अज्ञात वाहनाची दुचाकीस धडक; महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

Speeding Unidentified Vehicle :भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना  १२ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता घडली. या प्रकरणी  पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Speeding Unidentified Vehicle
देऊळगाव राजात खळबळ; मोटारसायकलला जोरदार धडक देत चालक फरार

देऊळगाव राजा : भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना  १२ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता घडली. या प्रकरणी  पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी रोहित अशोक मिनासे (वय ४२, रा. बालाजी मंदिर जवळ, देऊळगाव राजा) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून कायमी अप क्रमांक १०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायदा कलम १३४ अंतर्गत अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निकेत सुरेश मिनासे (वय ४२) हे महावितरणचे कंत्राटी कर्मचारी होते. ते १२ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता मोटारसायकल (क्रमांक MH 28 AT 7356) वरून जालना रोडवरून देऊळगाव राजा येथे येत होते. याच दरम्यान बायपासवरील अंजीक्य वाईन बारजवळील मटन विक्री दुकानासमोर पाठीमागून आलेल्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने भरधाव आणि निष्काळजीपणे मोटारसायकलला जोरदार धडक दिली.या भीषण धडकेत निकेत मिनासे यांना डोक्याला व शरीराच्या डाव्या बाजूस गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले; मात्र गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद १४ मार्च रोजी दुपारी १.१४ वाजता देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हेडकॉन्स्टेबल माधव कुटे यांनी पार पाडली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे देऊळगाव राजा परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top