Government Services Delivered :पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबिराचे शनिवारी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पातूरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या उपस्थितीत महसूल शिबिर; विविध प्रमाणपत्रांचे तत्काळ वाटप
राहुल सोनोने
दिग्रस बु. : पातूर तहसील अंतर्गत येणाऱ्या बाभूळगाव येथे महसूल विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ शिबिराचे शनिवारी सकाळी ११ वाजता मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन पातूरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
उपविभागीय अधिकारी संतोष येवलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी पर्यवेक्षकधीन विश्वजीत खंदारे, नायब तहसीलदार दिनकर केंद्रे, अजय तेलगोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मंचावर माजी उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर, अतुल अमानकर, कृष्णा अंधारे, कार्यक्रमाच्या अध्यक्षा व सरपंच मीराताई पाचपोर, उपसरपंच किसन गावंडे, माजी पोलीस पाटील विनायक पाचपोर, पोलीस पाटील राजूभाऊ देशमुख, निवृत्ती भालतीळक, राजू गावंडे, संजय पाचपोर, पत्रकार दुले खान, राहुल सोनोने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

शिबिराच्या माध्यमातून डिजिटल सातबारा, आयुष्यमान कार्ड, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, भूमी प्रमाणपत्र, शेतमजूर व मजूर प्रमाणपत्र, नवीन रेशन कार्ड तसेच गोल्डन कार्ड आदी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांच्या महसूलविषयक अडचणींचे निरसन करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी शेफाली देशमुख, ग्राम महसूल अधिकारी वैभवी रौंदळे, अनुपमा खरतडे, डी. के. देशमुख, संतोष मिल्खे, रविशंकर पाली, विलास गवई, सेतू संचालक राजेश पाटकर, रवींद्र तेलंगडे, रवींद्र खेकडे, राम महाले यांनी परिश्रम घेतले.
यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सेतूधारक, आशा सेविका, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वजीत खंदारे यांनी केले, संचालन शेफाली देशमुख यांनी केले तर आभार तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांनी मानले.

