Gang Stealing :समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल चोरीप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

किनगाव राजा पोलिसांनी चोरीच्या घटनेचा लावला छडा
दुसरबीड : समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल चोरीप्रकरणी किनगाव राजा पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २ मार्च २०२६ रोजी किनगाव राजा पोस्ट परिसरातील समृद्धी महामार्गालगत बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या व अँगल अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी किनगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. गुप्त माहिती तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा माग काढत पोलिसांनी अभि देशमुख, विलास दुंडियार (रा. दुसरबीड) आणि देवानंद डोईफोडे (रा. केशव शिवणे) या तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेल्या लोखंडी जाळ्या व अँगलसह सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले टाटा एस (छोटा हत्ती) वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल सध्या जालना येथील चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, किनगाव राजा हद्दीसह समृद्धी महामार्ग आणि राज्य महामार्गालगत अनेक ठिकाणी लोखंडी जाळ्या चोरी झाल्याच्या तक्रारी यापूर्वीही प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस हवालदार विष्णू मुंढे, पोलीस कॉन्स्टेबल जीवन जयभाये आणि गणेश वारकरी यांनी केली असून प्रकरणाचा पुढील तपास किनगाव राजा पोलीस करत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

