Mahabreaking

[breaking_news]

Speeding Truck Crashes :चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक समोरच्या ट्रकवर आदळला,  दोन ठार, चार बकऱ्यांचा मृत्यू

Speeding Truck Crashes : खामगाव–अकोला मार्गावरील वरखेड परिसरात शुक्रवारी (दि. १३) सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून काही बकऱ्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Speeding Truck Crashes

 खामगाव–अकोला मार्गावरील वरखेड परिसरातील घटना, मृतक राजस्थानातील

 खामगाव : खामगाव–अकोला मार्गावरील वरखेड परिसरात शुक्रवारी (दि. १३) सकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास दोन ट्रकांमध्ये भीषण अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत चार बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून काही बकऱ्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सायबर विकृतीचा कळस!  फोटो व्हायरलची धमकी देत महिलेला केले ब्लॅकमेल

मिळालेल्या माहितीनुसार, बकऱ्या वाहतूक करणारा ट्रक खामगावहून अकोल्याच्या दिशेने जात होता. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येत असलेल्या टाईल्सने भरलेल्या ट्रकने नियंत्रण सुटल्याने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अपघातात इकबाल अली खान (वय २२, रा. नयना, किशनगड, राजस्थान) आणि मोसम खान अशरूप खान (वय ३२, रा. डवका, किशनगड, राजस्थान) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसऱ्या जखमीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याने प्राण सोडले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले. धडकेच्या तीव्रतेमुळे बकऱ्या वाहून नेणाऱ्या ट्रकमधील चार बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी काही बकऱ्या गंभीर जखमी झाल्या.

या दुर्घटनेमुळे काही काळ खामगाव–अकोला मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top