Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Illegal Excavation:अवैध उत्खनन; दंड न भरणाऱ्या पुण्याच्या कंपनीविरुध्द फौजदारी कारवाईचे आदेश

Illegal Excavation:परवानगी न घेता लाखो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाच्या महसुलाला मोठा फटका दिल्याचा गंभीर प्रकार मेहकर तालुक्यात उघडकीस आला आहे. हिवरा खुर्द येथील तलाव प्रकल्प परिसरात बेकायदेशीर उत्खनन करून क्रशर मशीन चालविल्याप्रकरणी पुणे येथील कंपनीच्या व्यवस्थापकांविरुद्ध जानेफळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Illegal Excavation
हिवरा खुर्द परिसरात बेकायदेशीर उत्खनन भोवले

मेहकर : परवानगी न घेता लाखो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन करून शासनाच्या महसुलाला मोठा फटका दिल्याचा गंभीर प्रकार मेहकर तालुक्यात उघडकीस आला आहे. हिवरा खुर्द येथील तलाव प्रकल्प परिसरात बेकायदेशीर उत्खनन करून क्रशर मशीन चालविल्याप्रकरणी पुणे येथील कंपनीच्या व्यवस्थापकांविरुद्ध जानेफळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी तहसीलदार निलेश भिवाजी मडके (कार्यालय तहसील मेहकर, जि. बुलढाणा) यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपी म्हणून वॉटरफ्रंट कन्स्ट्रक्शन प्रा. लि., पुणे या कंपनीचे व्यवस्थापक अनिल सुरेशचंद्र मुंदडा व हर्षद सुरेश मुंदडा यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहकर तालुक्यातील मौजे हिवरा खुर्द (सारंगवाडी) येथील तलाव प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले. मात्र हे उत्खनन करण्यापूर्वी महसूल विभाग किंवा सक्षम प्राधिकरणाकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. याशिवाय गट क्रमांक ५४९ मध्ये परवानगीशिवाय गिट्टी क्रशर मशीन उभारून सप्टेंबर २०१३ ते एप्रिल २०१५ या कालावधीत तब्बल ३,७६,०८४ ब्रास गौण खनिजाचे उत्खनन केल्याचे तपासात समोर आले.
या बेकायदेशीर उत्खनन प्रकरणात प्रशासनाने यापूर्वीच कंपनीवर मोठी दंडात्मक कारवाई केली होती. संबंधित प्रकरणात कंपनीवर २९ कोटी १८ लाख ७७ हजार १२४ रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी २२ कोटी ५६ लाख ५० हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला होता. मात्र कंपनी व्यवस्थापनाने ही रक्कम अद्यापही न भरल्याने प्रशासनाने अधिक कठोर भूमिका घेत फौजदारी कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार भारतीय दंड संहिता कलम ३७९, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८(७), ४८(८), पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ९ व १५ तसेच खाण व खनिज अधिनियम १९५७ मधील कलम ४ व २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष जाधव करीत असून, अवैध उत्खनन प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या प्रकरणात पुढील कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top