Mahabreaking

🔴 BREAKING
Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग? Parents Meeting  :न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन! Encroachments :बाळापूर शहरातील सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे होणार नियमाकुल Gas Cylinders :पातुरात गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या रांगा, वाटपात अनियमिततेचा भाजपचा आरोप Speeding Cargo Vehicle :भरधाव मालवाहु वाहनाची दुचाकीस धडक, एक युवक जागीच ठार Rejects No-Confidence Motion :खैरव – बारलिंगा गट ग्रामपंचायतच्या सरपंचाविरुद्धचा अविश्वास ग्रामसभेने फेटाळला Sand Mafia  :खडकपूर्णा प्रकल्पात रेती माफियांचा हैदोस; अधिकारी कारवाईत, तर कनिष्ठ कर्मचारी मलाई खाण्यात दंग?

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi :प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता १३ मार्चला होणार वितरित; ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना लाभ

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील २२ वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आसाम राज्यातील गुवाहाटी येथील ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा येथून वितरित करण्यात येणार आहे.

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi
बुलढाणा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत डिसेंबर २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीतील २२ वा हप्ता पंतप्रधानांच्या हस्ते शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता आसाम राज्यातील गुवाहाटी येथील ज्योती-बिष्णु आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र, खानापारा येथून वितरित करण्यात येणार आहे.

केंद्र शासनाने शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा या उद्देशाने फेब्रुवारी २०१९ पासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २ हजार रुपये) थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते.
या योजनेद्वारे राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत २१ हप्त्यांद्वारे सुमारे ३९ हजार ३०० कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. सध्या भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत करणे, बँक खाते आधाराशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणिकरण या तीन अटी पूर्ण केलेल्या राज्यातील सुमारे ९१.१९ लाख शेतकरी कुटुंबांना १३ मार्च रोजी सुमारे १ हजार ८३७ कोटी रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा व तालुका स्तरावरील कृषी कार्यालये, ग्रामपंचायत, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPC), शेतकरी उत्पादक संघटना (FPO) तसेच सहकारी पतसंस्था (PACS) येथे आयोजित करण्यात येणार आहे. नागरी सुविधा केंद्रांवरूनही या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे.
कृषी विभाग, महसूल व वन विभाग तसेच ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच https://pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top