Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Burglary in Jalakkhed :जवळखेड येथे घरफोडी; तीन घरांमधून १ लाख १० हजारांची रोकड लंपास

Burglary in Jalakkhed :तालुक्यातील जवळखेड गावात मंगळवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कुलूप तोडून तब्बल १ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Burglary in Jalakkhedगजानन तिडके 

देऊळगाव राजा : तालुक्यातील जवळखेड गावात मंगळवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांचे कुलूप तोडून तब्बल १ लाख १० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून देऊळगाव राजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळखेड येथील रहिवासी व शेतकरी देविदास आश्रुबा गाटोळे (वय ४४) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मंगळवार, १० मार्च रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास गावातील काही घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
फिर्यादी देविदास गाटोळे यांच्या घरातील लोखंडी पेटीत ठेवलेले १० हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले. याच परिसरातील शांताबाई कुंडलिक गाटोळे यांच्या घराचे कुलूप तोडून लोखंडी पेटीत ठेवलेले ४० हजार रुपये चोरून नेण्यात आले. तसेच कांताबाई गणेश घोलप (रा. तढेगाव) यांच्या घरातील कापूस विक्रीतून मिळालेले व पत्र्याच्या पेटीत ठेवलेले ६० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
या प्रकारात एकूण १ लाख १० हजार रुपयांची रोकड अज्ञात इसमाने चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली आहे. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(१), ३३१(२) व ३०५ नुसार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याची नोंद पोलीस कर्मचारी निलीमा जाधव यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ काकड करीत आहेत. परिसरातील संशयितांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top