Mahabreaking

[breaking_news]

Iftar party in Madina Masjid :बिबी येथील मदिना मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी उत्साहात; मुस्लिम बांधवांकडून एकतेचा संदेश

Iftar party in Madina Masjid :बिबी येथील मदिना मस्जिदमध्ये रमजान महिन्याच्या निमित्ताने १८ व्या रोजाच्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘मस्जिद परिचय’ हा विशेष कार्यक्रमही घेण्यात आला. या उपक्रमातून सर्व धर्मीय नागरिकांना एकत्र आणत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.

Iftar party in Madina Masjid

रमेश खंडागळे 

बिबी : बिबी येथील मदिना मस्जिदमध्ये रमजान महिन्याच्या निमित्ताने १८ व्या रोजाच्या दिवशी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘मस्जिद परिचय’ हा विशेष कार्यक्रमही घेण्यात आला. या उपक्रमातून सर्व धर्मीय नागरिकांना एकत्र आणत सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला.

बिबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिलांचा गौरव; आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सत्कार

कार्यक्रमासाठी गावातील सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना आमंत्रित करण्यात आले होते. सायंकाळी रोजा सोडण्याच्या वेळी मुस्लिम बांधवांनी मस्जिदमध्ये टेबल-खुर्च्यांची व्यवस्था करून सर्वांना एकत्र बसण्याची उत्तम सोय केली होती. रोजा सोडताना खजूर, केळी, सफरचंद, विविध प्रकारची फळे, ज्यूस, शरबत आदी पदार्थांचा आस्वाद सर्वांनी एकत्रित घेतला. यावेळी मुस्लिम बांधवांनी रोजाचा उपवास सोडत सामूहिक इफ्तार करण्यात आला.

यानंतर ‘मस्जिद परिचय’ कार्यक्रमात अंधेरा येथील पत्रकार हनिफ शेख यांनी नमाज, आजान व मस्जिदमधील धार्मिक परंपरांविषयी माहिती दिली. तसेच मुर्तिजापूर येथून आलेले इम्तियाज भाई यांनी इस्लाम धर्माबद्दल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात बोलताना बिबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी सर्व धर्मीयांनी सण-उत्सव एकत्र साजरे केल्यास समाजात एकोपा व बंधुभाव वाढतो, असे मत व्यक्त केले. मुस्लिम बांधवांनी सर्व धर्मीय नागरिकांना एकत्र आमंत्रित करून इफ्तार पार्टीचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुकही केले.

यावेळी अरविंद चव्हाण, अनिस शेख, जमीर शेख, महेबुब शेख, एजाज सैयद, जाकीर शेख, आलिम साहेब, वसीम सैयद मौलाना, बबन बनकर, विठ्ठल पाटील, करपे महाराज, संदीप बनकर, अभय चव्हाण, कृष्णा पंधे, प्रदीप चव्हाण, बाबा शहा, खामगाव येथील जाकीरभाई तसेच बिबी येथील सर्व धर्मीय प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top