Mahabreaking

🔴 BREAKING
As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट first phase of the Crop Insurance Scheme :पीक विमा योजनेतील पहिल्या टप्यात जिल्ह्याला ५६४ कोटी , ९८ हजार रुपये मिळणार Sivendrasinharaje Bhosale :महाराणी गुणवंताबाईंच्या ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा : शिवेंद्रसिंहराजे भोसले Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास

one-day Vipassana meditation : बोरगाव मंजू येथे एकदिवसीय विपश्यना ध्यान साधना शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

one-day Vipassana meditation : पितामह उ बा खीन यांच्या जयंतीनिमित्त धम्मगिरी इगतपुरीच्या मार्गदर्शनाखाली धम्म मंजुषा विपश्यना केंद्र, बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय ध्यान साधना शिबिराला साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

one-day Vipassana meditation

बोरगाव मंजू : पितामह ऊ बा खीन यांच्या जयंतीनिमित्त धम्मगिरी इगतपुरीच्या मार्गदर्शनाखाली धम्म मंजुषा विपश्यना केंद्र, बोरगाव मंजू यांच्या वतीने आयोजित एकदिवसीय ध्यान साधना शिबिराला साधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

भूमिगत गटार योजनेला सुरुवातीपासूनच तडा; गंगानगरात सांडपाणी थेट चेंबरमध्ये

नवनिर्माणाधीन धम्म ध्यान साधना गृह येथे ६ मार्च रोजी हे शिबिर पार पडले. या शिबिरात परिसरातील शेकडो साधकांनी सहभागी होत ध्यान साधनेचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन धम्म मंजुषा विपश्यना केंद्राच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.

धम्मगिरी इगतपुरीद्वारे संचालित धम्म मंजुषा विपश्यना केंद्र बोरगाव मंजू येथे उभारण्यात आले असून येथे ध्यान साधनेसाठी भव्य धम्म सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. या केंद्रात वर्षभर ध्यान साधना तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबविले जातात.

एकदिवसीय शिबिराला सकाळी प्रारंभ झाला. दिवसभर साधकांनी शांत वातावरणात ध्यान साधना केली. सायंकाळी ‘मंगल मैत्री’ घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली.

या शिबिराचे मार्गदर्शन पू. सहाय्यक आचार्य उषा तायडे, पू. आचार्य भगतजी व पू. आचार्य रविंद्र पोद्दार यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडले.

आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात शांत व चिंतामुक्त जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे विपश्यना असल्याचे सांगत अधिकाधिक साधकांनी अशा शिबिरांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन बोरगाव मंजू विपश्यना प्रचार समिती व धम्म मंजुषा विपश्यना केंद्राच्या संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top