Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Registration :देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची हमीभावाने नोंदणी सुरू

Registration : शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा व तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 1 मार्च 2026 पासून सुरू झाली असून शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी केले आहे.

Registration

देऊळगाव राजा : शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा व तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 1 मार्च 2026 पासून सुरू झाली असून शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे यांनी केले आहे.

शासनाने हरभऱ्याचा हमीभाव प्रति क्विंटल 5,875 रुपये निश्चित केला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करताना अद्ययावत पिक नोंदीसह 7/12 उतारा, त्यावरील पिक क्षेत्रफळाची नोंद, आधार कार्ड, आधारशी लिंक असलेले बँक खाते, नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक तसेच बायोमेट्रिक नोंदणीसाठी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.

बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देऊळगाव राजा येथील बाजार समिती कार्यालयात तसेच देऊळगाव मही येथील छत्रपती अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, CCI (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) मार्फत हमीभावाने कापूस विक्रीसाठी 15 मार्च 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून स्लॉट बुक करून एफएक्यू (चांगल्या दर्जाचा) कापूस विक्रीस आणावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. कापूस विक्रीस आणताना कवडी मिश्रित कापूस आणू नये, अन्यथा खरेदी प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात, अशी सूचना देण्यात आली आहे.

शेतकरी बांधवांनी शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घेण्यासाठी हरभऱ्याची ऑनलाईन नोंदणी करून दर्जेदार हरभरा व कापूस विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती समाधान भिकाजी शिंगणे, उपसभापती दादाराव भगवान खार्डे तसेच संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top