Mahabreaking

[breaking_news]

Amrapali Gavai :साखरखेर्ड्याच्या आम्रपाली गवईला पाली विषयात सुवर्णपदक

Amrapali Gavai : येथील कै. भास्करराव शिंगणे कला, नारायण गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी आम्रपाली राजू गवई हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत वाड्मय स्नातक उन्हाळी २०२५ परीक्षेत पाली विषयात सर्वाधिक गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.

Amrapali Gavai

साखरखेर्डा : येथील कै. भास्करराव शिंगणे कला, नारायण गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी आम्रपाली राजू गवई हिने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत वाड्मय स्नातक उन्हाळी २०२५ परीक्षेत पाली विषयात सर्वाधिक गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले आहे.दि. २३ फेब्रुवारी रोजी अमरावती येथे पार पडलेल्या विद्यापीठाच्या ४२ व्या दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते आम्रपाली गवई हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

अनुभवसंपन्न शेतकऱ्यांकडून नवनवीन तंत्रे व व्यवहारज्ञान आत्मसात करा : सतीश कायंदे

आम्रपाली ही साखरखेर्डा येथील विद्यार्थिनी असून तिच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पाली भाषा ही अतिशय प्राचीन भारतीय भाषा असून ती प्रामुख्याने थेरवाद बौद्ध धर्माच्या धार्मिक व साहित्यिक परंपरेशी संबंधित आहे. इंडो-आर्यन भाषा समूहातील ही भाषा मध्य इंडो-आर्यन भाषांपैकी एक मानली जाते. भगवान बुद्धांनी आपले उपदेश जनसामान्यांच्या भाषेत दिले; पुढे तीच भाषा ‘पाली’ म्हणून ओळखली जाऊ लागली.

पाली ही बौद्ध धर्माच्या ‘त्रिपिटक’ या पवित्र ग्रंथाची मूळ भाषा आहे. भाषिक रचनेत ती संस्कृतपेक्षा सोपी मानली जाते आणि प्राकृत भाषांचा एक प्रकार म्हणूनही तिचा उल्लेख केला जातो. अहिंसा, दया आणि समता या तत्त्वांवर आधारित समृद्ध साहित्य पाली भाषेत आढळते. पाली भाषेचा उगम व विकास भारतात झाला असून कालांतराने ती श्रीलंका, म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि लाओस या दक्षिण-पूर्व आशियाई देशांत पसरली. आज जगातील अनेक विद्यापीठांत पाली भाषेचा अभ्यास केला जातो. भारतातही पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

‘आम्रपाली’ या नावात असलेले ‘पाली’ आणि पाली विषयात मिळवलेले सुवर्णपदक हा एक सुंदर योगायोग ठरला आहे. आपल्या यशाचे श्रेय आम्रपालीने आई-वडील व शिक्षकांना दिले आहे. ती गजानन गवई यांची पुतणी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top