Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Incident in Harankhed :तुरीच्या आगीत चिमुकला गेला, धक्क्याने आईचाही मृत्यू; हरणखेड येथील घटना

Incident in Harankhed :एका क्षणात आनंदी घरावर काळाने झडप घातली आणि मायलेकांचे नाते कायमचे तुटले. बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओमचा होरपळून मृत्यू झाला; आणि पोटच्या लेकराच्या मृत्यूची बातमी समजताच आजारपणाने खंगलेल्या आईनेही धक्क्याने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना २२ फेब्रुवारी रोजी हरणखेड येथे घडली.

Incident in Harankhed

मलकापूर : एका क्षणात आनंदी घरावर काळाने झडप घातली आणि मायलेकांचे नाते कायमचे तुटले. बैलगाडीवरील तुरीच्या गंजीला लागलेल्या भीषण आगीत सात वर्षीय ओमचा होरपळून मृत्यू झाला; आणि पोटच्या लेकराच्या मृत्यूची बातमी समजताच आजारपणाने खंगलेल्या आईनेही धक्क्याने प्राण सोडल्याची हृदयद्रावक घटना २२ फेब्रुवारी रोजी हरणखेड येथे घडली.

‘वेतन शासनाचे, पण उपचार खाजगीतून; दे. राजा तालुक्यात पशुवैद्यकीय शासकीय सेवा नावालाच

शेतकरी संदीप होले सकाळी शेतात गेले होते. दुपारी ओम वडिलांना घरी बोलावण्यासाठी शेतात आला. त्या वेळी तुरीच्या पेंढ्या गोळा करून बैलगाडीवर रचण्यात आल्या होत्या. ओम त्या गंजीवर बसला होता. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास आजूबाजूचा कचरा जाळला जात असताना अचानक जोराचा वारा सुटला. पेटलेल्या कचऱ्यातील ठिणगी तुरीच्या पेंढ्यांवर पडताच आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले.

संदीप होले यांनी आरडाओरडा केला; परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. गंभीर भाजलेल्या ओमला तत्काळ उपचारासाठी मलकापूर येथे नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढे जळगाव येथे हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

ही बातमी समजताच अंथरुणाला खिळून असलेल्या आई वनिता होले (३२) यांना असह्य धक्का बसला आणि त्यांनीही अखेरचा श्वास घेतला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी व दुपारी मायलेकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top