Mahabreaking

[breaking_news]

Scholarship battle :अकोला जिल्ह्यात उद्या शिष्यवृत्तीची रणधुमाळी; १७ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

Scholarship battle : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (PUP) इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (PSS) इयत्ता ८ वी परीक्षा रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण १०२ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
Scholarship battle
  १०२ केंद्रांवर PUP-PSS परीक्षा; प्रशासनाची चोख तयारी पूर्ण; कडेकोट बंदोबस्तात प्रश्नपत्रिका; आठ भरारी पथकांची नियुक्ती
संजय तायडे 
अकोला : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात येणारी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (PUP) इयत्ता ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (PSS) इयत्ता ८ वी परीक्षा रविवार, दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण १०२ परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे.
यंदा इयत्ता ५ वीचे १०,५८६ तर इयत्ता ८ वीचे ६,४३१ असे एकूण १७,०१७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून जिल्ह्यात शैक्षणिक वातावरण उत्साहपूर्ण झाले आहे.
जिल्ह्यात इयत्ता ५ वी साठी ६० व इयत्ता ८ वी साठी ४२ अशी एकूण १०२ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
अ.क्र. तालुका ५ वी ८ वी
१ अकोला      १८    १६
२ अकोट          ७     ४
३ बाळापुर        ६        ५
४ बार्शिटाकळी ५         ४
५ मुर्तिजापूर   ८            ५
६ पातूर   ६                  ४
७ तेल्हारा    ७              ३
८ मनपा    ३                  १
एकूण
६०४२
  दोन सत्रांत परीक्षा
परीक्षेचे दोन पेपर असतील.
पेपर क्र. १ : सकाळी ११.०० ते १२.३०
पेपर क्र. २ : दुपारी २.०० ते ३.३०
विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
 कडेकोट व्यवस्था, गोपनीय साहित्य पोलिस बंदोबस्तात
परीक्षेचे गोपनीय साहित्य तालुकास्तरावर संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले असून ते पोलिस बंदोबस्तात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. परीक्षेच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचविण्यात येणार आहेत.
तालुकास्तरावर संबंधित गटशिक्षणाधिकारी हे तालुका समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. प्रत्येक केंद्रासाठी केंद्रसंचालक व पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी सर्व केंद्रसंचालकांची जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली.
  जिल्हा प्रशासनाचे नियोजन पूर्ण
संपूर्ण नियोजन जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक)   रतनसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. सहसमन्वयक म्हणून उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)  जितेंद्रकुमार प्रधान व विस्तार अधिकारी (शिक्षण)   श्याम राऊत हे कामकाज पाहत आहेत.
परीक्षा निकोप व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हास्तरावर आठ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून तालुकानिहाय केंद्रभेटीचे नियोजनही करण्यात आले आहे.
राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या दिशेने विद्यार्थ्यांची पहिली पायरी मानली जाणारी ही शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून सर्व आवश्यक उपयोजना करण्यात आल्या असून जिल्हाभरात परीक्षेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी अकोला पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top