Mahabreaking

[breaking_news]

Shiv Jayanti :धम्मगिरी बुद्धविहारात शिवजयंती उत्साहात; शिवराय-आंबेडकर विचारांचा जागर

Shiv Jayanti : मलकापूर रोडवरील धम्मगिरी बुद्ध विहार येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. विहार समिती व सम्यक समन्वय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Shiv Jayanti

विहार समिती व सम्यक समन्वय समितीचा पुढाकार

बुलढाणा : मलकापूर रोडवरील धम्मगिरी बुद्ध विहार येथे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. विहार समिती व सम्यक समन्वय समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. अप्पर जिल्हाधिकारी रमेश घेवंदे होते. प्रमुख अतिथी म्हणून स्वीकृत नगरसेवक सुनील सपकाळ, मोहन पऱ्हाड व अरविंद होंडे उपस्थित होते. विशेष उपस्थितीत भीमराव जाधव, आर.के. इंगळे, विद्यासागर मिसाळकर, दिलीप वाघमारे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. तसेच एस.यू. बावस्कर, पी.आर. इंगळे, मंगल मिसाळ, भैय्यासाहेब पाटील, बाबासाहेब जाधव, अशोक दाभाडे, विजय राऊत, संजय कस्तुरे, विजय वाकोडे, सुनील धुरंधर, सुभाष साबळे, प्रेम इंगळे, सुरेश सरकटे, मिलिंद वानखडे, प्रिन्स हिवाळे, दादाराव पगारे, अर्चना जाधव, सुजाता हिवाळे आदी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंगल प्रसंगी शिवरायांना अभिवादन करून मान्यवरांनी आपल्या भाषणांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे महत्त्व विषद केले. सामाजिक न्याय, स्वराज्य आणि लोककल्याण या मूल्यांची आजही आवश्यकता असल्याचे वक्त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक दाभाडे यांनी केले, प्रास्ताविक मिलिंद वानखडे यांनी मांडले तर आभार प्रदर्शन प्रेम इंगळे यांनी केले. सरनत्तय गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

जिल्ह्यातील इतर महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी बुलढाणा या पेजला भेट द्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top