Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Shiv Jayanti :बोरगाव मंजूत डीजेला फाटा देत टाळ-मृदंगात शिवजयंती उत्साहात

Shiv Jayanti : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोरगाव मंजू येथे पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. डीजे व ढोल-ताशांना फाटा देत टाळ-मृदंगाच्या तालावर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उत्सव ठरला.

Shiv Jayanti

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचा उपक्रम; गुलालऐवजी फुलांची उधळण

बोरगाव मंजू : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोरगाव मंजू येथे पारंपरिक आणि शिस्तबद्ध पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. डीजे व ढोल-ताशांना फाटा देत टाळ-मृदंगाच्या तालावर काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने ग्रामस्थांचे विशेष लक्ष वेधून घेतले. सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उत्सव ठरला.

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या पुढाकारातून १९ फेब्रुवारी रोजी आकर्षक रथावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. रथावरील पुतळ्याचे पूजन-अर्चन व दीपप्रज्वलन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी सर्व जाती-धर्मांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मिरवणूक भवानीपुरा येथून प्रारंभ होऊन बसथांबा, मेन रोड तसेच गावातील प्रमुख मार्गांवरून नगरप्रदक्षिणा घालत काढण्यात आली. ठिकठिकाणी चौकांमध्ये थांबून फुलांचा वर्षाव करण्यात आला. गुलालाऐवजी फुलांची उधळण करून पर्यावरणपूरक आणि संयमी उत्सव साजरा करण्याचा संदेश देण्यात आला.

टाळ-मृदंगाच्या गजरात आणि शिवरायांच्या जयघोषात वातावरण भारावून गेले होते. अबालवृद्ध, महिला आणि चिमुकल्यांनी डोक्यावर भगवे फेटे, पांढरी वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. धार्मिक गीतगायनासह राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. भवानीपुरा येथील बाल हरिपाठ मंडळाने विशेष सहभाग घेत मिरवणुकीची शोभा वाढवली.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी स्थानिक पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. गावातील विविध भागांतही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिकतेचा आग्रह, शिस्त आणि सामाजिक सलोखा यामुळे बोरगाव मंजूतील शिवजयंती उत्सव राजकीय व सामाजिक पातळीवर आदर्श ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी अकोला या पेजला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top