Mahabreaking

[breaking_news]

Shiv Jayanti :साखरखेर्ड्यात शिवजयंती उत्साहात; ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन

Shiv Jayanti : समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती साखरखेर्डा येथे शिवरायांच्या जयघोषात व ढोल-ताशांच्या निनादात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगरीतील तसेच परिसरातील युवक, लहान-थोर स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी झाले होते.

Shiv Jayanti

साखरखेर्डा: समस्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती साखरखेर्डा येथे शिवरायांच्या जयघोषात व ढोल-ताशांच्या निनादात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नगरीतील तसेच परिसरातील युवक, लहान-थोर स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने सहकुटुंब सहभागी झाले होते.

मेहकर टी-पॉईंट चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत स्थापना करण्यात आली होती. सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांनी पुतळ्याचे पूजन करून मनोभावे वंदन केले. बाळगोपाळांनीही जयंती सोहळ्यात सहभाग घेत शिवरायांना अभिवादन केले. “जय भवानी, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. उपस्थित शिवभक्तांना भगवी शिवटोपी व भगवा रूमाल देऊन सन्मानित करण्यात आले. काही शालेय विद्यार्थी व नागरिकांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषणे केली. उत्सव समितीचे अध्यक्ष सुधाकर पऱ्हाड यांनी स्वराज्य स्थापना व सर्वधर्मसमभाव जपत केलेल्या राज्यकारभाराविषयी सविस्तर विवेचन केले.

सकाळी सुमारे १० वाजता सामूहिक जिजाऊ वंदना घेऊन महाराजांना अभिवादन करण्यात आले. विविध पक्षांचे पदाधिकारी, विविध जाती-धर्मातील नागरिक तसेच गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ जाधव, श्रीनिवास खेडेकर, सरपंच सौ. ज्योती सचिन जाधव, कार्याध्यक्ष सुनील रिंढे, कोषाध्यक्ष अरुण देशमुख, माजी सरपंच कमलाकर गवई, रावसाहेब देशपांडे, माजी सभापती राजू ठोके, महेंद्र पाटील, अर्जुन गवई, अंकूर देशपांडे, सिताराम काळे, पूनमताई पाटील, स्नेहल पाटील, ठाणेदार गजानन करेवाड, सीताराम तायडे, संदीप मगर, अशोकराव पाटील, सुनील जगताप, दिलीप बेंडमाळी, ललित अग्रवाल, डॉ. ज्ञानेश्वर तांगडे, राजू काटे, ईश्वर पऱ्हाड, सोनू पवार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवि पऱ्हाड, पवन जाधव, विलास रिंढे, कुणाल सुस्ते, बबलू पवार आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान, श्री शिवाजी व्यायामशाळा परिसरातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित महिलांनी महाआरती करून पूजन केले. यावेळी वार्ड क्रमांक ५ मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top