Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

robot dog :रोबो डॉगनंतर सॉकर ड्रोन वादात; गलगोटिया विद्यापीठ पुन्हा चर्चेत

robot dog : राजधानीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान अव्यवस्था आणि कुप्रबंधनाच्या आरोपांबरोबरच गलगोटिया विद्यापीठ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. चीनमध्ये तयार झालेला रोबो डॉग स्वतःचा असल्याचा दावा केल्याचा आरोप विद्यापीठावर झाला असून, या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

robot dog

एआय समिटमध्ये गोंधळ, दाव्यांवर प्रश्नचिन्ह; विद्यापीठाची माफी

नवी दिल्ली : राजधानीत सुरू असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिटदरम्यान अव्यवस्था आणि कुप्रबंधनाच्या आरोपांबरोबरच गलगोटिया विद्यापीठ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. चीनमध्ये तयार झालेला रोबो डॉग स्वतःचा असल्याचा दावा केल्याचा आरोप विद्यापीठावर झाला असून, या प्रकरणाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने बुधवारी सायंकाळी निवेदन जारी करून माफी मागितली. गैरसमजामुळे चुकीची माहिती दिली गेल्याचे स्पष्ट करत त्यांनी समिटमधील आपला स्टॉलही रिकामा केल्याचे सांगितले. तांत्रिक माहिती योग्यरीत्या न मिळाल्याने प्रतिनिधीकडून माध्यमांशी बोलताना चुकीची माहिती दिली गेली, असे विद्यापीठाने नमूद केले. शैक्षणिक प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि जबाबदार सादरीकरणासाठी आपण वचनबद्ध असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, यापूर्वी प्रा. नेहा सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना संबंधित रोबोट विद्यापीठात विकसित केला जात असल्याचे सांगितले होते. ‘बिल्ड’ आणि ‘डिव्हेलप’ यामधील फरक लक्षात घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर विद्यापीठावर टीकेची झोड उठली.

सॉकर ड्रोनवरून नवा वाद

रोबो डॉग प्रकरण शांत होण्याआधीच सॉकर ड्रोनसंदर्भातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात प्रा. नेहा सिंह यांनी एंड-टू-एंड इंजिनिअरिंगपासून अॅप्लिकेशनपर्यंत सर्व काम विद्यापीठात झाल्याचा दावा केला. कॅम्पसमध्ये भारतातील पहिले ड्रोन सॉकर अरेना असल्याचेही त्यांनी म्हटले.

या दाव्यावर इंडिया यूथ काँग्रेस ने सोशल मीडियावर टीका करत, संबंधित ड्रोन कोरियन तंत्रज्ञानावर आधारित असल्याचा आरोप केला. व्हिडिओतील ड्रोन दक्षिण कोरियातील हेलसेल कंपनीच्या ‘स्ट्रायकर V3 ARF’ मॉडेलशी मिळताजुळता असल्याचे सांगितले जात आहे. या ड्रोनची किंमत सुमारे ४१ हजार रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.

फुटबॉल आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या संयोगातून विकसित झालेला ‘ड्रोन सॉकर’ हा भविष्योन्मुख खेळ मानला जातो. दोन संघांमध्ये प्रत्येकी पाच खेळाडू असतात आणि प्रगत कार्बन मटेरियल व ड्रोन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा खेळ खेळला जातो.रोबो डॉगनंतर सॉकर ड्रोन प्रकरणामुळे गलगोटिया विद्यापीठावरील वाद अधिक तीव्र झाला असून, एआय समिटमधील व्यवस्थापनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top