Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Illegal sand transportation :नियमांना डावलून खापरखेड रेती घाटावरून अवैध रेती वाहतूक; ग्रामस्थांचा आरोप

Illegal sand transportation :  येथून जवळ असलेल्या लोणार तालुक्यातील खापरखेड रेती घाटावर सर्व नियमांना डावलून पोकलॅंडच्या साहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याची शंका उपस्थित होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Illegal sand transportation

अशोक इंगळे

साखरखेर्डा  : येथून जवळ असलेल्या लोणार तालुक्यातील खापरखेड रेती घाटावर सर्व नियमांना डावलून पोकलॅंडच्या साहाय्याने रेतीचे अवैध उत्खनन सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. महसूल विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याची शंका उपस्थित होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेड रेती घाटावर पोकलॅंड (एलआर)च्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू आहे. संबंधित ठेकेदार व त्यांच्या भागीदारांकडील वाहने वाहतूक परवाना (पास) न घेता रेतीची अवैध वाहतूक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असतानाही महसूल विभाग केवळ पाहण्याची भूमिका घेत असल्याने महसूल अधिकारी आणि ठेकेदार यांच्यात संगनमत असल्याची चर्चा सुरू आहे.

पोकलॅंडच्या साहाय्याने दिवस-रात्र उत्खनन होत असल्यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. शासकीय नियमांचे काटेकोर पालन करूनच उत्खनन करावे, असे स्पष्ट आदेश असतानाही प्रस्तावित गटाच्या बाहेरील क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आल्याचा आरोप आहे.

प्रस्तावित गटातून काढलेल्या रेतीचे मोजमाप करण्यात यावे, तसेच इतर गटातून झालेल्या उत्खननाची चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी व नियमबाह्य उत्खनन प्रकरणी ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत किनगाव जट्टू ते खापरखेड दरम्यान सिमेंट रस्ता बांधण्यात आला आहे. या रस्त्याची क्षमता सुमारे १० टनांपर्यंत असताना त्यावरून ४० ते ५० टन क्षमतेचे रेतीने भरलेले टिप्पर भरधाव वेगाने धावत असल्याने रस्ता एक-दोन महिन्यांतच उध्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या गंभीर बाबीकडे बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन अवजड रेती वाहतूक बंद करावी तसेच ठेकेदाराने पर्यायी रस्ता उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी नौशाद शेख (माजी उपसरपंच, दूसरबीड़) आणि रामेश्वर काळुसे (देऊळगाव कोळ) यांनी महसूल आयुक्त, अमरावती यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top