Mahabreaking

[breaking_news]

helping hand :आत्महत्याग्रस्त कुटुंबाला ग्रामस्थांचा मदतीचा हात; मुलीच्या नावावर २५ हजारांचा फिक्स डिपॉझिट बाँड

 helping hand : शिंदी येथील स्व. अनिल सुभाष येरमुले यांनी एक वर्षापूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ग्रामस्थांनी पुढाकार घेत १३ फेब्रुवारी रोजी एकूण २५ हजार रुपयांचा फिक्स डिपॉझिट बाँड कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.

helping hand

साखरखेर्डा : शिंदी येथील स्व. अनिल सुभाष येरमुले यांनी एक वर्षापूर्वी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने ग्रामस्थांनी पुढाकार घेत १३ फेब्रुवारी रोजी एकूण २५ हजार रुपयांचा फिक्स डिपॉझिट बाँड कुटुंबीयांच्या स्वाधीन केला.

ग्रामपंचायत सरपंच अशोक आत्माराम खरात यांनी वैयक्तिकरित्या ११ हजार रुपयांची मदत दिली, तर गावकऱ्यांनी एकत्रितपणे १४ हजार रुपये जमा केले. हा एकूण २५ हजार रुपयांचा स्टेट बँक, साखरखेर्डा शाखेचा फिक्स डिपॉझिट बाँड स्व. येरमुले यांच्या मुलगी कु. स्वरा अनिल येरमुले हिच्या नावाने त्यांच्या पत्नी रंजना अनिल येरमुले यांना देण्यात आला.

स्व. अनिल येरमुले हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी व दोन मुलांची संपूर्ण जबाबदारी पत्नीवर आली आहे. या कठीण परिस्थितीत कुटुंबाला मदतीचा हात देणे हे सामाजिक कर्तव्य समजून ग्रामस्थांनी सहकार्य केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी शिवसेना नेते गंभीरराव खरात, सरपंच अशोक आत्माराम खरात, तंटामुक्ती अध्यक्ष परमेश्वर खरात, ग्रामपंचायत अधिकारी अनंता इंगळे, गणेश खरात, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश खोसे, शेख अन्सार शेख शफी तांबोळी, स्व. येरमुले यांचे वडील सुभाष येरमुले, जनार्दन मार्के आदी उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top