Mahabreaking

🔴 BREAKING
Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह Rajlakshmi International School : राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचा एसएससी परीक्षेत उत्कृष्ट निकाल; उज्ज्वल यशाची परंपरा कायम Man Arrested  :गस्तीवर असलेल्या पोलिसाला शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा जेरबंद Jai Bhim Chants in Patur :पातुरात जय भीमचा जयघोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन  Dr. Babasaheb Ambedkar :कारेगाव येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Shyam Manav :भोंदू खरात व इतर बुवा बाबांचे प्रस्थ वाढविण्याचे काम फडणवीस सरकारने केले; श्याम मानव   Stop Child Marriage :पोलिस आणि बाल कल्याण समितीने थांबवला बालविवाह

drinking alcohol :खुल्या जागेत दारू पिणाऱ्या ४४ जणांना दणका, नाकाबंदीत बेशिस्त वाहनचालकांकडून ८० हजार दंड वसूल

drinking alcohol : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना सुरक्षित, शांततामय वातावरण मिळावे यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलिसांनी आकस्मिक नाकाबंदी मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर व बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई केली.

drinking alcohol

अकोला पोलिसांची धडक कारवाई : विशेष पथकांच्या माध्यमातून जिल्हाभरात मोहिम

अकोला : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि नागरिकांना सुरक्षित, शांततामय वातावरण मिळावे यासाठी पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलिसांनी आकस्मिक नाकाबंदी मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्यांवर व बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाई केली.
७ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेदरम्यान विशेष पथके तयार करून जिल्हाभर आकस्मिक नाकाबंदी करण्यात आली. या वेळी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणे, शांतता भंग करणे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ४४ इसमांविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान जिल्ह्यातील ३५ तपासणी नाक्यांवर एकूण १,०१९ वाहनांची तपासणी करण्यात आली. मोटार वाहन कायद्यान्वये १५५ प्रकरणांत कारवाई करून वाहनचालकांकडून एकूण ८०,४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेदरम्यान सर्व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी नाकाबंदी स्थळांना भेटी देत देखरेख ठेवली, तर ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रभावी कारवाई केली.
बेकायदेशीर कृत्यांपासून नागरिकांनी दूर राहावे तसेच कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले. कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक तीव्रतेने राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता असून कायद्याचे पालन करून सर्वांनी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यास हातभार लावावा, असे आवाहनही पोलिस प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top