Mahabreaking

🔴 BREAKING
Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार Fatal accident :गावंडगाव शिवारात भीषण अपघात; ऑटो उलटल्याने मजुराचा मृत्यू, दोन महिला जखमी Revenue Satisfaction Camp :देऊळगाव राजात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानाचा शुभारंभ The pilgrimage began :सैलानी यात्रेला प्रारंभ; लाखो नारळांच्या होळीने वातावरण दुमदुमले election bell :शेगाव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला PM Kisan installment :जिल्ह्यातील सहा हजारावर शेतकरी पीएम किसानच्या हप्त्याला मुकणार Teacher from Paturda :शाळेकडे जात असताना काळाचा घाला; पातुर्डा बु. येथील शिक्षिका अपघातात ठार

Abhinav Mohod :राज्यस्तरीय पावरलिफ्टिंग स्पर्धेत अभिनव मोहोडचे कांस्यपदक; अमरावती विभागाचा मान उंचावला

Abhinav Mohod : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे (महाराष्ट्र राज्य) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अभिनव सुशील मोहोड याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात मिळवलेल्या या यशामुळे अमरावती विभागासह अकोला जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

Abhinav Mohod

बोरगाव मंजू  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे (महाराष्ट्र राज्य) तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सातारा यांच्या वतीने दि. ३ व ४ फेब्रुवारी रोजी आयोजित राज्यस्तरीय शालेय पावरलिफ्टिंग स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अभिनव सुशील मोहोड याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. ५३ किलो वजनगटात मिळवलेल्या या यशामुळे अमरावती विभागासह अकोला जिल्ह्याचा मान उंचावला आहे.

माजी सैनिक अभिमान व्यायामशाळा, कुरणखेड तसेच श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूल, मुर्तिजापूर येथील विद्यार्थी असलेल्या अभिनवने राज्यातील आठ विभागांतील स्पर्धकांमध्ये दमदार कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत मुंबई, नाशिक, पुणे, लातूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती आणि मराठवाडा विभागांचा सहभाग होता. त्यामध्ये अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत अभिनवने कांस्यपदक जिंकून उल्लेखनीय यश संपादन केले.

अभिनवच्या या यशाबद्दल अमरावती विभाग, अकोला जिल्हा, शाळा आणि मूळ गावात सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने संस्थेचे अध्यक्ष अवधूत ढोरे, शाळेच्या प्राचार्या सारिका कडू, क्रीडा शिक्षक निलेश उंबरकर, तसेच आई-वडिलांना दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top