Mahabreaking

[breaking_news]

A two-wheeler was stolen :डोणगावात दुचाकी केली लंपास, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

A two-wheeler was stolen : सध्या डोणगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, लगतच्या मादणी गावातही चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्री-अपरात्री सर्रास डल्ले टाकले जात असताना पोलीस गस्त नेमकी कुठे आहे? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. डोणगाव येथे दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री साडे दोन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी राहणारे नारायण माधव कावले यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.

A two-wheeler was stolen

डोणगाव : सध्या डोणगाव परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, लगतच्या मादणी गावातही चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रात्री-अपरात्री सर्रास डल्ले टाकले जात असताना पोलीस गस्त नेमकी कुठे आहे? असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. डोणगाव येथे दि. २ फेब्रुवारी रोजी रात्री साडे दोन वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी राहणारे नारायण माधव कावले यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कावले यांच्या घरासमोर उभी असलेली होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल (क्र. MH-28 BC-5948) अंदाजे ३० हजार रुपये किंमतीची असून, ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे.

या प्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास डोणगाव पोलीस करत आहेत.

विशेष म्हणजे, मोटारसायकल चोरी करून नेत असताना संबंधित चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे आता तरी डोणगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी झालेल्या अनेक चोऱ्यांचा अद्यापही उलगडा झालेला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top