Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर Dr. Babasaheb Ambedkar :मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन  Two goats stolen along with an Eco van :पांग्रीत ईको वाहनासह दोन शेळ्या केल्या लंपास ; १.९९ लाखांचा ऐवज लंपास MNS Launches Agitation :नारायण खेड रेती घाटावर मनसेचा एल्गार; कारवाई न झाल्याने तहसील कार्यालयासमोर उपोषण Auto-rickshaw driver :मोहाडी येथील ऑटोचालकाची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या arrested red-handed :घरकुलच्या हप्त्यासाठी मागितली २५ हजारांची लाच; १० हजार रुपये घेतांना रंगेहाथ अटक MLA Randhir Savarkar :खरीप हंगामात खते-बियाण्यांची टंचाई होऊ देऊ नका – आमदार रणधीर सावरकर

attacked with a blade : जुना वाद उफाळला; ब्लेडने वार करून तरुणाला केले जखमी

attacked with a blade : जुन्या वादातून तरुणावर ब्लेडने हल्ला करून जखमी केल्याची घटना देऊळगाव मही येथे घडली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

attacked with a blade

देऊळगाव मही येथील घटना, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

देऊळगाव राजा : जुन्या वादातून तरुणावर ब्लेडने हल्ला करून जखमी केल्याची घटना देऊळगाव मही येथे घडली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी शंकर विष्णु डोळझाके (वय २५, व्यवसाय – मजुरी, रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून आरोपी विठ्ठल भगवान डोईजड (रा. देऊळगाव मही, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास देऊळगाव मही येथे फिर्यादी शंकर डोळझाके हे आपल्या मित्रासोबत उभे असताना आरोपी विठ्ठल डोईजड याने त्यांच्याशी वाद घातला. यावेळी आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करत “तू आमचे पाहुणे पांडुरंग गोरे यांना का मारले?” असा जाब विचारला. त्यानंतर आरोपीने हातातील ब्लेडने फिर्यादीच्या डाव्या हातावर वार करून त्यांना जखमी केले. या घटनेनंतर फिर्यादीने देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. त्यावरून आरोपी विठ्ठल डोईजड याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top