Mahabreaking

[breaking_news]

A speeding car :भरधाव कारची दुचाकीस धडक, एक जण गंभीर जखमी

A speeding car : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास देउळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी देउळगाव राजा पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A speeding car

अशोक ढाब्यासमोरील घटना: कार चालकाविरुध्द गुन्हा दाखल

गजानन तिडके 
देउळगाव राजा : भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास देउळगाव राजा–जालना मार्गावरील अशोक ढाब्यासमोर घडली. या प्रकरणी देउळगाव राजा पोलीस ठाण्यात 30 जानेवारी रोजी चारचाकी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश रंगनाथ पाटोळे (वय 38, व्यवसाय – मजुरी, रा. शिराळा ता. जाफ्राबाद जि. जालना, सध्या रा. शिवाजीनगर, देउळगाव राजा) हे त्यांच्या एमएच 21 एझेड 1442 क्रमांकाच्या मोटारसायकलने जालना येथून घरी परत येत होते. त्याच वेळी त्यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर (एमएच 28 बीक्यू 1981) या चारचाकी वाहनाच्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवत जोरदार धडक दिली.
या अपघातात फिर्यादी प्रकाश पाटोळे हे दुचाकीवरून रस्त्यावर कोसळले. त्यांना डोक्याला, हाताला व पायाच्या टाचेला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करून जखमीस उपचारासाठी दाखल केले.
या घटनेप्रकरणी फिर्यादीच्या तोंडी फिर्यादीवरून देउळगाव राजा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम 281, 125 (A) तसेच मोटार वाहन कायदा कलम 134 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोरे हे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top