Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Anand Sagar dhaba : मूर्ती शिवारातील ‘आनंद सागर’ धाब्यावर तुफान राडा; दोन गटात हाणामारी

Anand Sagar dhaba : मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारात असलेल्या ‘आनंद सागर’ धाब्यावर बुधवारी रात्री ग्राहक आणि कर्मचार्यांमध्ये तुफान राडा झाला. या घटनेत परस्पर मारहाण, शिवीगाळ व तोडफोड झाल्याने बोराखेडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्ररीवरून सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Anand Sagar dhaba

धाब्यातील साहित्याची तोडफोड, परस्परविरोधी तक्रारीवरून सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

मोताळा : मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारात असलेल्या ‘आनंद सागर’ धाब्यावर बुधवारी रात्री ग्राहक आणि कर्मचार्यांमध्ये तुफान राडा झाला. या घटनेत परस्पर मारहाण, शिवीगाळ व तोडफोड झाल्याने बोराखेडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्ररीवरून सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पहिल्या घटनेत धाबा मालक हसन शहा उमर शहा (वय ३०, रा. कोथळी, ता. मोताळा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दि. २८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी योगेश चव्हाण, हर्षल पवार व योगेशचा भाऊ (नाव माहित नाही) हे लोखंडी रॉड घेऊन आनंद सागर धाब्यावर आले. आरोपींनी काउंटरमधील पैसे काढण्याचा प्रयत्न केला. यास फिर्यादीने विरोध केल्यावर आरोपी योगेश चव्हाण याने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. तसेच आरोपी क्र. १ व २ यांनी फिर्यादीच्या वडिलांना चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर तिन्ही आरोपींनी धाब्यावरील प्लास्टिक खुर्च्या, टेबल व काउंटरची तोडफोड करून सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच घटनेबाबत आरोपींपैकी योगेश गोपीचंद चव्हाण (वय २४, रा. नेहरू नगर, ता. मोताळा) यांनीही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, ते दि. २८ जानेवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मित्र हर्षल पवार याच्यासोबत आनंद सागर धाब्यावर जेवणासाठी गेले असता, तेथील कामगारांनी जेवण देण्यास नकार दिला. यानंतर वाद होऊन धाब्यावरील मालक व कामगारांनी शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून धाब्यावर काम करणार्या तिघांविरुध्द भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही गुन्हे बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून, दाखल अधिकारी पोहेकॉ. भगवान सुरडकर यांनी नोंद केली आहे. दोन्ही प्रकरणांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शेंगेपल्लु यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. घटनेचा नेमका तपशील, वादाचे मूळ कारण व जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top