Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

Ajitdada Pawar : महाराष्ट्राच्या कणखर नेतृत्वाला अखेरचा सलाम; मेहकरमध्ये अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Ajitdada Pawar : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प. गट)चे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करत असताना त्यांच्या विमानाला दुर्दैवी अपघात झाला.या पार्श्वभूमीवर दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी गुरुवारी मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ajitdada Pawar

मेहकर : महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प. गट)चे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे विमानाने प्रवास करत असताना त्यांच्या विमानाला दुर्दैवी अपघात झाला. या दुर्घटनेत अजितदादा पवार यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांचाही मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या पार्श्वभूमीवर दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी गुरुवारी मेहकर येथील स्वातंत्र्य मैदानात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गिरीधर पाटील यांनी केले. यावेळी मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय रायमुलकर, नगराध्यक्ष किशोर गारोळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस शाम उमाळकर, माजी नगराध्यक्ष कासम गवळी, तहसीलदार निलेश मडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, भीमशक्तीचे नेते भाई सुखदाणे, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस अनंतराव वानखेडे, वसंतराव देशमुख, मेहकर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी अजितदादा पवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, अजय चैताने, सुधीर सारोळकर, किशोर ढेपले, विशाल शिरपूरकर, संतोष राणे तसेच विविध राजकीय पक्षांचे नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी पक्षभेद विसरून अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे संचालन सिद्धेश्वर पवार व युनूस पटेल यांनी केले. शेवटी दिवंगत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top