Mahabreaking

🔴 BREAKING
The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष The thieves have crossed all limits :चोरट्यांची हद्दच झाली, शेततळ्यातील ताडपत्रीच केली लंपास ; जवळखेड शिवारातील घटना Sanghatan Srujan Abhiyan :‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत पातुरात बैठक ; काँग्रेसच्या बळकटीसाठी मंथन Public Awareness Campaign  :प्रधानमंत्री रस्ता अपघात पीडित सहाय्यता योजनेविषयी जनजागृती Three Gas Cylinders Explode :हॉटेलातील तीन गॅस सिलिंडरचा स्फोट;  वृध्दासह दोन जण जखमी dead monkey :खिरपुरी येथील जलकुंभात मृत वानर आढळल्याने खळबळ Bhim Jayanti Celebrated :मलकापूर पांग्रा येथे भीमजयंतीचा उत्साहात, जयभीमचा जयघोष

RTO : आरटीओचा अभिनव उपक्रम : ‘रस्ता सुरक्षा सखी’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

RTO : प्रजासत्ताक दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या औचित्याने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अकोला यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा सखी’ या अभिनव जनजागृती कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांमार्फत रस्ता सुरक्षेचा संदेश समाजात रुजावा आणि तो त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

प्रजासत्ताक दिन व रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून जनजागृती

अकोला : प्रजासत्ताक दिन आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या औचित्याने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) अकोला यांच्या वतीने आयो

RTO

जित करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा सखी’ या अभिनव जनजागृती कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांमार्फत रस्ता सुरक्षेचा संदेश समाजात रुजावा आणि तो त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

आरटीओ रवींद्र भुयार तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ कार्यालयातील महिला मोटार वाहन निरीक्षकांनी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. महिलांनी स्वतः रस्ता सुरक्षेचे नियम आत्मसात करून ते कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावेत, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमात उपस्थित महिलांनी वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करण्याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दीपमाला भटकर (शिक्षण विस्तार अधिकारी, जि. प. अकोला), देशोन्नतीच्या मनस्विनी उपक्रमाच्या संयोजिका सविता कुठे, मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी गडलिंगे, नारी शक्ती फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमैया अली, पत्रकार निशाली पंचगाव, स्वराज मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका वैशाली ढगे, लतिका सदापुरे आदी मान्यवर उपस्थित होत्या.

यावेळी मान्यवरांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला. मोटार वाहन निरीक्षक त्रिवेणी गडलिंगे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका राऊत, मनीषा पांचाळ व स्नेहल पुरी यांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.

कार्यक्रमात रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजुषेत सहभागी झालेल्या विजेत्यांना आरटीओ कार्यालयाच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी पळसपगार यांनी केले. प्रास्ताविक सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका राऊत यांनी मांडले, तर आभारप्रदर्शन मनीषा पांचाळ यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती लाभली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top