Mahabreaking

🔴 BREAKING
Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला Major Change in Recruitment Process :नोकरभरती प्रक्रीयेत मोठा बदल, आता एमपीएससी घेणार १०२ संवर्गासाठी परीक्षा 44th National Convention :अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये  Loot Valuables Worth  :डोणगावात चोरट्यांचा हैदोस, कुलूप तोडून १ लाख ७३ हजारांचा एवज केला लंपास Revenue Grievance Redressal Camp :धाबा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान ! Muslim community graveyard :साखरखेर्डा येथे मुस्लिम समाज कब्रस्तानमध्ये होणार सभा मंडप Heatwave wreaks :अकोल्यात उष्णतेचा कहर; पारा 43 अंशांवर पोहचला

A 14-year-old boy :किन्ही पवार येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा बेपत्ता  

A 14-year-old boy : तालुक्यातील किन्ही पवार गावातून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A 14-year-old boy
देऊळगाव राजा : तालुक्यातील किन्ही पवार गावातून एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी रेखा फकीरा खरात (वय ३४ वर्षे, रा. किन्ही पवार, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, त्यांचा अल्पवयीन मुलगा यश फकीरा खरात (वय १४ वर्षे) हा दि. २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला असून अद्याप तो परतलेला नाही. मुलाची उंची अंदाजे ५ फूट, रंग गोरा, अंगात काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट व फुल बाह्यांचे काळ्या रंगाचे शर्ट असा पोशाख होता.
कुटुंबीयांनी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता मुलाचा कोणताही मागमूस लागलेला नसल्याने अखेर पोलिसांकडे धाव घेतली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि. २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.३३ वाजता नोंदवण्यात आला. हा गुन्हा मपोहेकॉ सुषमा उईके (बन क्र. १७८५) यांनी दाखल केला असून, पोउपनि. ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. पोलिसांकडून परिसरातील माहिती, नागरिकांकडून मिळणारे धागेदोरे तसेच इतर तांत्रिक बाबींच्या आधारे अल्पवयीन मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top