Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

community hall :देऊळगाव साकर्शा येथे २५ लाखांच्या सभामंडपाचे भूमिपूजन; संजय रायमुलकर यांच्या हस्ते शुभारंभ

community hall : देऊळगाव साकर्शा येथील जगदंबादेवी मंदिराजवळ सुमारे २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

community hall

मेहकर  : देऊळगाव साकर्शा येथील जगदंबादेवी मंदिराजवळ सुमारे २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

भाविकांच्या मागणीनुसार संजय रायमुलकर यांच्या विशेष प्रयत्नातून या सभामंडपासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संदीप आल्हाट होते. यावेळी बोलताना संजय रायमुलकर म्हणाले की, “मेहकर–लोणार तालुक्यातील विविध गावांमधील ६०० हून अधिक धार्मिक स्थळांजवळ सभामंडपांचे बांधकाम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करता आले, याचा विशेष आनंद आहे. राज्यात महायुतीचे सरकार असल्याने पुढील काळातही विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.”

ते पुढे म्हणाले की, “सर्वधर्म समभाव जपत आम्ही सातत्याने कार्य करत आलो आहोत. मतदारसंघाला एक परिवार मानून नागरिकांच्या हितासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा मिळते.”

या कार्यक्रमास शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, अंबिका अर्बनचे अध्यक्ष मोहन धोटे, गणेश आल्हाट, मोतीचंद राठोड, सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी, तेजराव जाधव, सुपाजी पायघन, दिलीप नवत्रे, विनोद राठोड, रामदास महाराज, रोहिदास जाधव, वामन महाराज, पंढरी तोंडे, शेख अब्रार, गौरव देशमुख, सागर पायघन यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top