Mahabreaking

[breaking_news]

‘Operation Prahar’ :अवैध पेट्रोल वाहतुकीवर ‘ऑपरेशन प्रहार’चा घाव! ३५ लिटर पेट्रोल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘Operation Prahar’ : चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध पेट्रोल वाहतुकीवर चान्नी पोलिसांनी धडक कारवाई करत ३५ लिटर पेट्रोलसह दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Operation Prahar

राहुल सोनोने

दिग्रस बू   : चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत ऑपरेशन प्रहार अंतर्गत अवैध पेट्रोल वाहतुकीवर चान्नी पोलिसांनी धडक कारवाई करत ३५ लिटर पेट्रोलसह दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणेदार रवींद्र लांडे यांना गुप्त माहिती मिळाली होती की, खामगाव तालुक्यातील देऊळगाव साकर्शा येथून उमरा गावाच्या दिशेने दोन इसम दुचाकीवरून प्लास्टिक कॅनमध्ये अवैधरित्या पेट्रोलची वाहतूक करीत आहेत. माहितीची खातरजमा करत पोलिसांनी उमरा परिसरात सापळा रचला आणि संशयित दुचाकी अडवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान सावरगाव येथील कविश्वर जगराम आडे व नितेश वामन आडे या दोघांकडून प्लास्टिक कॅनमध्ये ३५ लिटर पेट्रोल आढळून आले. पोलिसांनी पेट्रोल व दुचाकी असा एकूण ४३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतील ऑपरेशन प्रहार अंतर्गत, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत बी. रेड्डी व बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रवींद्र लांडे, तसेच सुदर्शन चौरे व शिवनंद स्वामी यांनी केली.दरम्यान, अवैध पेट्रोल विक्री व वाहतुकीविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा चान्नी पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top