Mahabreaking

🔴 BREAKING
Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Bhim Jayanti :साखरखेर्डा नगरीत भीमजयंतीचा उत्साह;  लेझीम , टिपरी नृत्याने वेधले लक्ष Two Houses Burglarized :गंगानगरमध्ये चोरट्यांचा हैदोस, दोन घरे फोडली; सोने,चांदीची दागिणे केले लंपास The Bell Rings Again :17 वर्षांनी पुन्हा घंटा वाजली; दीनदयाल महाविद्याल;यात माजी विद्यार्थ्यांचा भावनिक ‘गेट टुगेदर’ Neminath Maharaj Saptah :ब्राह्मण चिकना येथे नेमिनाथ महाराज सप्ताहाची महाप्रसादाने सांगता Complaints of solar agricultural pump :सौर कृषी पंपधारकांच्या तक्रारींचा होणार जागेवरच निपटारा Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Students erupt in protest! : विद्यार्थिनींचा उद्रेक! अंजनी–मेहकर बससेवेअभावी रास्तारोको; मानव विकास मिशनअंतर्गत स्वतंत्र बसची  मागणी

Students erupt in protest! : अंजनी बुद्रूक परिसरातील शाळकरी मुली व विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध अखेर सुटला. एसटी बस वेळेवर थांबत नसल्याने व प्रचंड गर्दीमुळे शिक्षणाचा हक्क धोक्यात आल्याचा आरोप करत सोमवार, १९ जानेवारी रोजी विद्यार्थिनी व पालकांनी थेट बस रोखून रास्तारोको आंदोलन छेडले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. विद्यार्थिनींच्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर एसटी महामंडळाला माघार घ्यावी लागली आणि मेहकर आगारातून पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली.दरम्यान, या मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थीनींनी आमदार सिद्धार्थ खरात यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Students erupt in protest!

आमदार सिध्दार्थ खरात यांना विद्यार्थीनीने दिले निवेदन

मेहकर : अंजनी बुद्रूक परिसरातील शाळकरी मुली व विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध अखेर सुटला. एसटी बस वेळेवर थांबत नसल्याने व प्रचंड गर्दीमुळे शिक्षणाचा हक्क धोक्यात आल्याचा आरोप करत सोमवार, १९ जानेवारी रोजी विद्यार्थिनी व पालकांनी थेट बस रोखून रास्तारोको आंदोलन छेडले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. विद्यार्थिनींच्या आक्रमक भूमिकेपुढे अखेर एसटी महामंडळाला माघार घ्यावी लागली आणि मेहकर आगारातून पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली.दरम्यान, या मार्गावर मानव विकास मिशन अंतर्गत स्वतंत्र बस सुरू करण्याची मागणी विद्यार्थीनींनी आमदार सिद्धार्थ खरात यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

अंजनी बुद्रूक, अकोला ठाकरे व हिवरा साबळे येथील विद्यार्थी रोज शिक्षणासाठी मेहकर येथे ये-जा करतात. मात्र सकाळी ९.३० वाजता अंजनीहून सुटणारी बस सर्वसाधारण प्रवाशांसाठी असल्याने क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होते. परिणामी विद्यार्थ्यांना बसमध्ये चढणेही शक्य होत नाही. अनेकदा अर्धा-पिरियड वाया जातो. सायंकाळी ४ वाजता मेहकरहून सुटणारी बसही याच समस्येने ग्रस्त असल्याने विद्यार्थ्यांना दररोज हाल सहन करावे लागतात.

अंजनी गाव फाटा हा गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागते. घाटबोरी–मेहकर व लोणी गवळी–मेहकर या बसेस आधीच खचाखच भरलेल्या असल्याने चालक-वाहक बस थांबवत नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला. पूर्वी सुरू असलेली अंजनी–मेहकर स्वतंत्र बसफेरी बंद झाल्याने गैरसोय अधिकच वाढली आहे.

या पार्श्वभूमीवर अंजनी बुद्रूक येथील शाळकरी मुलींनी मेहकर–लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांना निवेदन देत मानव विकास मिशनअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवा सुरू करण्याची ठाम मागणी केली. सकाळी १०.३० वाजता अंजनी बुद्रूक ते मेहकर आणि सायंकाळी ५.०० वाजता मेहकर ते अंजनी बुद्रूक अशी फेरी केवळ विद्यार्थ्यांसाठी सुरू करावी, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. सध्या परीक्षेचा काळ असल्याने येत्या दोन दिवसांत बस सुरू करण्याची विनंतीही निवेदनात नमूद आहे.

निवेदनावर पूजा संजय पायघन, शितल संतोष ढोले, अनुराधा ज्ञानेश्वर नागोलकर, पूजा गजानन लाड, आरती ज्ञानेश्वर वानखेडे, साक्षी नागेश लाड, पूनम शिवाजी पायघन, पूजा विष्णू ढोले, कल्याणी मारोती सावसुंदर, पूजा गणेश लाड, कृष्णाली अशोक पिंपळे, आरती किसन खुरद, श्रावणी रामेश्वर ढोले, गायत्री महादेव पायघन, सभा फिरोज पठाण, अनुराधा सतीश आवटे यांच्यासह अनेक विद्यार्थी व पालकांच्या सह्या आहेत.

दरम्यान, मेहकर आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांनी सांगितले की, “आगारात बसेस मर्यादित आहेत. स्वतंत्र बस देणे सध्या शक्य नसले तरी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध फेऱ्यांबाबत चालक-वाहकांना सूचना देण्यात आल्या आहेत. तक्रार आल्यास कारवाई केली जाईल.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top