Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Gajanan Ghirke :उल्लेखनीय कार्याबद्दल गजानन घिरके यांचा जिजाऊ सृष्टी येथे विशेष सत्कार

Gajanan Ghirke : अन्न व औषध प्रशासन विभागात उल्लेखनीय व जबाबदारीची कामगिरी बजावणारे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ, सिंदखेडराजा येथे सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी हा सत्कार सोहळा पार पडला.

Gajanan Ghirke

सिंदखेड राजा : अन्न व औषध प्रशासन विभागात उल्लेखनीय व जबाबदारीची कामगिरी बजावणारे सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने जिजाऊ सृष्टी मातृतीर्थ, सिंदखेडराजा येथे सोमवार, दि. १२ जानेवारी रोजी हा सत्कार सोहळा पार पडला.

कोरोना काळात अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून औषधे, सॅनिटायझर, मास्क तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात आले. बनावट व निकृष्ट दर्जाच्या औषधांवर कठोर कारवाई करत नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या संपूर्ण कालावधीत सहाय्यक आयुक्त गजानन घिरके यांनी जिल्ह्यातील विविध यंत्रणांशी समन्वय साधत आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली.

मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यात त्यांच्या या सामाजिक व प्रशासकीय योगदानाची दखल घेत जाहीर सत्कार करण्यात आला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी उपचार अधिक सुलभ व्हावेत, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मान्यवरांनी यावेळी अधोरेखित केले.

हा सत्कार मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री डॉ. पुरुषोत्तम खेडेकर व शिवमती डॉ. रेखाताई खेडेकर (माजी आमदार, चिखली) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घोगरे, जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकरराव मेहेकरे, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, प्रदेश महासचिव चंद्रशेखर शिखरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, जिजाऊ ब्रिगेडच्या सीमाताई बोके, राज्य संघटक मनोहर तुपकर, सुभाषराव कोल्हे, ज्योतीताई राजे जाधव, अॅड. राजेंद्र ठोसरे, डॉ. बाळाजी काळकुंबे, अशपाकखान पठाण, अॅड. आरिफखान पठाण, कर्करोगतज्ज्ञ अमजदखान पठाण, उद्योजक संजय वायल आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top