Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

A leopard :कासारखेड परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात एका कालवडीचा बळी, शेतकऱ्यांत भीती

A leopard : मेहकर तालुक्यातील कासारखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून, यात एका कालवडीचा बळी गेला आहे. कासारखेड येथील शेतकरी विश्वास दादाराव सवडतकर हे गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) सकाळी शेतात गेले असता त्यांनी बांधलेली दोन जनावरे आढळून आली. त्यापैकी चार ते पाच वर्षांची एक कालवड बिबट्याने ठार केल्याचे निदर्शनास आले.

A leopard

हिवरा आश्रम  :  मेहकर तालुक्यातील कासारखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली असून, यात एका कालवडीचा बळी गेला आहे. कासारखेड येथील शेतकरी विश्वास दादाराव सवडतकर हे गुरुवारी (दि. १ जानेवारी २०२६) सकाळी शेतात गेले असता त्यांनी बांधलेली दोन जनावरे आढळून आली. त्यापैकी चार ते पाच वर्षांची एक कालवड बिबट्याने ठार केल्याचे निदर्शनास आले.

घटनेची माहिती मिळताच सतिश मवाळ यांनी तातडीने घाटबोरी वनपरिक्षेत्र अंतर्गत माडवा वर्तुळ, वडाळी बिटचे वनपाल व्ही. टी. मापारे तसेच वनरक्षक एस. ए. पडघान यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्याची दखल घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळी १० वाजता घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.

यावेळी तलाठी देशमुख, कृषी सहाय्यक शंकर वाघमारे, राजू सवडतकर, सतिश मवाळ यांच्यासह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

दरम्यान, ३१ डिसेंबरच्या सकाळीही कळंबेश्वर–दुधा परिसरात बिबट्याची पिल्ले आढळून आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण कासारखेड परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या पार्श्वभूमीवर कासारखेड परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीपंपाची वीज दिवसा देण्याची मागणी केली आहे. सध्या ऊस, तूर, गहू व हरभरा अशी पिके मोठ्या प्रमाणावर असल्याने रात्री पाणी देताना जीविताला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संभाव्य अनर्थ टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top