Mahabreaking

[breaking_news]

The leopard : पिल्लासाठी बिबट्या परतलाच नाही; वनविभागाच्या रेस्क्यू टीमने ट्रॅप लावून घेतली दक्षता

The leopard : दुधा–कळंबेश्वर रोडवरील शेतातील कोठ्यामध्ये बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केले. बिबट्याने नेलेले पिल्लू परत आणण्यासाठी तो रात्री पुन्हा येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाच्या रेस्क्यू टीमने योग्य ती खबरदारी घेत ट्रॅप लावला होता. मात्र बुधवारी रात्री बिबट्या पिल्लू नेण्यासाठी परत आला नाही.

The leopard

हिवरा आश्रम  : दुधा–कळंबेश्वर रोडवरील शेतातील कोठ्यामध्ये बिबट्याचे पिल्लू आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ही माहिती मिळताच शेतकऱ्यांनी तात्काळ वनविभागाला पाचारण केले. बिबट्याने नेलेले पिल्लू परत आणण्यासाठी तो रात्री पुन्हा येण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाच्या रेस्क्यू टीमने योग्य ती खबरदारी घेत ट्रॅप लावला होता. मात्र बुधवारी रात्री बिबट्या पिल्लू नेण्यासाठी परत आला नाही.

दुधा–कळंबेश्वर रोडवरील कळंबेश्वर येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून बुधवारी सकाळी बिबट्याने दोन पिल्ले तोंडात घेऊन जाताना शेतकऱ्यांनी पाहिले. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता एक बिबट्याचे बछडे गोठ्यातच आढळून आले. सदर पिल्लू तात्काळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

बिबट्या आपल्या पिल्लासाठी पुन्हा परत येईल, या शक्यतेने वनविभागाच्या रेस्क्यू टीमने संपूर्ण तयारी केली होती. घटनास्थळी ट्रॅप लावण्यात आला असून ट्रॅप कॅमेरेही बसवण्यात आले होते. मात्र गुरुवारी रात्रीपर्यंत बिबट्या परत न आल्याने रेस्क्यूची प्रक्रिया पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली.

या संपूर्ण कारवाईत घाटबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले, वडाळी बिटचे वनरक्षक शिवनारायण पडघान, पाचदेवळा बिटचे वनरक्षक उल्हास भोंडणे, संदीप मडावी तसेच बुलढाणा येथील रेस्क्यू टीममधील प्रवीण सोनवणे व पवन वाघ सहभागी होते. वनविभागाकडून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top