Mahabreaking

[breaking_news]

Illegal fishing :खडकपूर्णा धरणात अवैध मासेमारी भोवली; चार जणांवर गुन्हा दाखल

Illegal fishing :तालुक्यातील खडकपूर्णा धरण हे सध्या अवैध रेती चोरीप्रमाणेच मत्स्य चोरी करणाऱ्या तस्करांचे अड्डे बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खडकपूर्णा जलाशय हा अधिकृतपणे मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थेला दिलेला असतानाही, त्यामध्ये बेकायदेशीर मत्स्यमारी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी स्वतः प्रत्यक्ष धाड टाकून चार मत्स्य तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे.

Illegal fishing

पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांची धडक कारवाई

गजानन तिडके 
देऊळगाव राजा :तालुक्यातील खडकपूर्णा धरण हे सध्या अवैध रेती चोरीप्रमाणेच मत्स्य चोरी करणाऱ्या तस्करांचे अड्डे बनत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. खडकपूर्णा जलाशय हा अधिकृतपणे मत्स्य व्यवसायासाठी सहकारी संस्थेला दिलेला असतानाही, त्यामध्ये बेकायदेशीर मत्स्यमारी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी स्वतः प्रत्यक्ष धाड टाकून चार मत्स्य तस्करांवर गुन्हा दाखल केला आहे.
खडकपूर्णा नदीपात्र व जलाशय परिसरात सातत्याने मत्स्य चोरी होत असल्याबाबत देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला लेखी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी व त्यांच्या पथकाने दि. २४ रोजी सकाळी खडकपूर्णा जलाशयात अचानक छापा टाकला.
या छाप्यात आरोपी परमेश्वर दशरथ दुंडियार, संतोष राजू चिंधोटे, भगवान रामकिसन चिंधोटे, विष्णू बन्सी बिलगे (सर्व रा. कुंभारझरी, ता. जाफराबाद, जि. जालना) हे चोरीछुप्या मार्गाने अवैधरित्या मत्स्यमारी करताना रंगेहाथ आढळून आले.
या प्रकरणी अनिल कौतिकराव वायाळ, अध्यक्ष, खडकपूर्णा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था, रा. चिंचखेड यांनी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार संबंधित चारही आरोपींविरुद्ध मत्स्य चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत 90 हजार रुपयांचे मासे लंपास केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद साळवे करीत आहेत.
दरम्यान, खडकपूर्णा धरण परिसरात अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top