Mahabreaking

[breaking_news]

obtained a yield of 71 tons of sugarcane : मासरूळच्या शेतकऱ्याने घडवला चमत्कार; एक डोळा पद्धतीतून घेतले एकरी ७१ टन ऊस उत्पादन

obtained a yield of 71 tons of sugarcane :  बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील प्रगतिशील शेतकरी शेषराव सावळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी एक डोळा पद्धतीने १३ एकर क्षेत्रात ऊस लागवड करून त्यांनी एकरी तब्बल ७१ टन उत्पादन घेतले आहे. या नव्या पद्धतीमुळे ऊस पिकाचा कालावधी सुमारे एक महिन्याने कमी झाला असून ही पद्धत अधिक किफायतशीर ठरली आहे.

obtained a yield of 71 tons of sugarcane

पंडित सावळे

मासरूळ :  बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील प्रगतिशील शेतकरी शेषराव सावळे यांनी ऊस लागवडीच्या तंत्रात बदल करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी एक डोळा पद्धतीने १३ एकर क्षेत्रात ऊस लागवड करून त्यांनी एकरी तब्बल ७१ टन उत्पादन घेतले आहे. या नव्या पद्धतीमुळे ऊस पिकाचा कालावधी सुमारे एक महिन्याने कमी झाला असून ही पद्धत अधिक किफायतशीर ठरली आहे.

मासरूळ परिसरात प्रामुख्याने माळरानावर कांदा, भाजीपाला, गहू, ज्वारी अशी पिके घेतली जातात. मर्यादित पाणीसाठा असलेल्या काही ठराविक शेतकरीच ऊस पीक घेतात. मात्र अशा परिस्थितीतही ऊस पिकामुळे शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. अलीकडच्या काळात येथील शेतकरी शेतीत बदल करून नवनवीन प्रयोग करू लागले असून शेषराव सावळे हे त्याचे उत्तम उदाहरण ठरले आहेत.

यापूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेषराव सावळे यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेत एक डोळा पद्धतीने ऊस लागवड यशस्वी करून दाखवली. हिमालय कृषी सेवा केंद्र, धाड येथील साचलक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी १३ एकर क्षेत्रात ही लागवड केली. सुरुवातीला डोळा काढणी यंत्र, लागवड तंत्रज्ञानाची माहिती नसणे अशा अनेक अडचणी आल्या. मात्र कृषी विस्तार अधिकारी सोनुने यांच्या सहकार्यामुळे या अडचणींवर मात करता आली.

या पद्धतीत उसाबरोबर आंतरपिके घेण्याचीही संधी उपलब्ध होते. पारंपरिक पद्धतीत एकरी दोन ते तीन टन ऊस बियाणे लागत असते; मात्र एक डोळा पद्धतीमुळे अत्यल्प बियाण्यात लागवड शक्य झाली. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने एकरी सुमारे ४० टन उत्पादन मिळत होते; आता मात्र ते वाढून ७१ टनांपर्यंत पोहोचले आहे.योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान आणि नव्या संशोधनामुळे शेतीला नवी दिशा मिळाल्याचे शेतकरी शेषराव सावळे यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top