Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

Country liquor :कारमधून देशी दारुची वाहतुक, दोघांवर गुन्हा दाखल, ४८० देशी दारूच्या बाटल्या जप्त

Country liquor :जाफ्राबादहून देऊळगाव राजा दिशेने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Country liquor
नाकाबंदीत देऊळगाव राजा पोलिसांची मोठी कारवाई; १ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा एवज जप्त

देऊळगाव राजा : जाफ्राबादहून देऊळगाव राजा दिशेने अवैधरित्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त केली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ डिसेंबर २०२५ रोजी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम जाफ्राबाद येथून देऊळगाव राजा येथे चारचाकी वाहनातून देशी दारू विक्रीसाठी अवैधरित्या वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक निलेश ताबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या आदेशाने कारवाईचे पथक रवाना करण्यात आले.पोउपनि. व्ही. एस. पटेल, एएसआय प्रमोद मुळे, पोहेकॉ रामकिसन गिते व पोकों विनोद चव्हाण यांच्या पथकाने जाफ्राबाद रोडवरील पिंपळगाव शिवारात नाकाबंदी केली. यावेळी पांढऱ्या रंगाची इंडीगो कार (क्रमांक MH-28-V-3310) संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपास केला असता कारमध्ये दोन इसम आढळून आले.कार चालकाने आपले नाव रंजित अशोक यज्ञेकर (वय २७, रा. संजय नगर, देऊळगाव राजा) तर त्याच्या शेजारी बसलेल्या इसमाने आपले नाव राजकुमार सुभाष मांटे (वय ३४, रा. स्वामी विवेकानंद नगर, देऊळगाव राजा) असे सांगितले. पंचासमक्ष वाहनाची झडती घेतली असता टॅगो कंपनीच्या कागदी बॉक्समध्ये १८० एमएल क्षमतेच्या एकूण ४८० काचेच्या देशी दारूच्या शिश्या आढळून आल्या. प्रत्येकी ८० रुपये किमतीप्रमाणे या दारूची किंमत ३८ हजार ४०० रुपये असून, वाहनाची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये अशी एकूण १ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस स्टेशन देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि. व्ही. एस. पटेल हे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान, देऊळगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत परवाना धारक देशी दारू विक्रेत्यांनी दुकानातून अवैधरित्या दारूची वाहतूक केल्यास त्यांच्याविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे (दारूबंदी विभाग) प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top