Mahabreaking

🔴 BREAKING
Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह  Tehran shaken! :तेहरान हादरले! इराण-इस्त्रायल युद्ध भडकले; दुबईसह अमेरिकन तळांवरही हल्ले Bribery game exposed :‘लाचखोरीचा खेळ’ उघड; अपर कोषागार अधिकाऱ्यासह तिघे एसीबीच्या जाळ्यात! Janavi Ulemale :‘प्रेरणा’ राज्यस्तरीय शिबिरासाठी जाधव महाविद्यालयाची जानवी उलेमालेची निवड Two-wheeler theft :चिखलीत दुचाकी चोरीचा लावला छडा; जालना जिल्ह्यातून आरोपी जेरबंद  Kejriwal-Sisodia acquitted :मद्य धोरण प्रकरणात केजरीवाल–सिसोदिया निर्दोष; राऊज अ‍ॅव्हेन्यू न्यायालयाचा मोठा दिलासा Brother murdered :सख्या भावाची केली हत्या, पुरावा नष्ट करण्यासाठी जाळला मृतदेह 

Samruddhi Highway  :रेतीच्या अवैध वाहतुकीसाठी समृद्धी महामार्गाचा वापर, रेती माफीयांनी तयार केले अनधिकृत रस्ते 

Samruddhi Highway  :डोणगाव परिसरात महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. रेती माफियांनी चक्क बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत अनधिकृत रस्ता तयार करून रात्री-अपरात्री सर्रास रेती वाहतूक सुरू केली असून, डोणगाव व परिसरात सर्वत्र बांधकामासाठी रेतीचे ढिग दिसत आहेत. मात्र, डोणगाव परिसरात रेती माफियांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Samruddhi Highway
डोणगाव : डोणगाव परिसरात महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध रेती वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. रेती माफियांनी चक्क बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत अनधिकृत रस्ता तयार करून रात्री-अपरात्री सर्रास रेती वाहतूक सुरू केली असून, डोणगाव व परिसरात सर्वत्र बांधकामासाठी रेतीचे ढिग दिसत आहेत. मात्र, डोणगाव परिसरात रेती माफियांवर ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डोणगाव येथून जाणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जलद वाहतुकीसाठी ओळखला जातो. मात्र, आता याच महामार्गाचा वापर अवैध रेती वाहतुकीसाठी केला जात असल्याचे स्पष्ट होत आहे. डोणगावजवळील गोहोगाव शिवारात बेलगावकडे जाणाऱ्या मार्गावर नदीलगत रेती माफियांनी समृद्धी महामार्गावरील लोखंडी रॉड काढून रेती वाहने उतरविण्यासाठी थेट अनधिकृत रस्ता तयार केला आहे.
या प्रकाराकडे ना समृद्धी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष आहे, ना महसूल विभागाने याची दखल घेतलेली दिसते. परिणामी, समृद्धी महामार्गावरून खुलेआम अवैध रेती वाहतूक सुरू आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top