Mahabreaking

🔴 BREAKING
Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट Assistant Revenue Officer Arrested :फेरफार रद्द आदेशाची मूळ प्रतसाठी मागितली २० हजारांची लाच; सहाय्यक महसूल अधिकारी गजाआड the Indian Constitution :आंबेडकरी तरुणांनी भारतीय संविधानाची व्याप्ती वाढवावी Internal Fissures Erupt within Shinde Sena :शिंदे सेनेतील अंतर्गत मतभेदचा उद्रेक; संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत आजी-माजी पदाधिकारी भिडले Insurance companies :विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, बुलढाण्यात शेतकरी संतप्त As Temperatures Soar :अकोल्याचा पारा चढताच; प्रशासनाकडून ‘डू अँड डोन्टस्’ जारी Rural Livestock Population :चाराटंचाईमुळे ग्रामीण भागातील पशुधन संख्येत मोठी घट

Ashok Kakade : विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा ‘स्मिता–स्मृती पुरस्कार २०२५’ अशोक काकडे यांना जाहीर

Ashok Kakade : सामाजिक सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या दिव्य सेवा प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे यांना विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा मानाचा ‘स्मिता–स्मृती पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. मानसिक आजारग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गेली बारा वर्षे अविरतपणे कार्य करणाऱ्या अशोक काकडे यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे. रविवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, नागपूर येथे राज्याचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अशोक काकडे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Ashok Kakade
महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्या नागपूरात सन्मान

बुलढाणा : सामाजिक सेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या दिव्य सेवा प्रकल्पाचे संचालक अशोक काकडे यांना विदर्भ गौरव प्रतिष्ठानचा मानाचा ‘स्मिता–स्मृती पुरस्कार २०२५’ जाहीर झाला आहे. मानसिक आजारग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गेली बारा वर्षे अविरतपणे कार्य करणाऱ्या अशोक काकडे यांच्या कार्याचा हा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे. रविवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह, नागपूर येथे राज्याचे महसूल मंत्री  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते अशोक काकडे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पद्मश्री स्मिता पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ हा ‘स्मिता–स्मृती पुरस्कार’ दिला जातो. रोख एकवीस हजार रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ संपादक बाळ कुळकर्णी, आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्यासह विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० हून अधिक मनोरुग्णांचे यशस्वी पुनर्वसन करण्यात आले आहे. उपचार, समुपदेशन व पुनर्वसन या सर्व पातळ्यांवर त्यांनी राबवलेले कार्य राज्यभर उल्लेखनीय ठरले आहे. उपेक्षित घटकांना माणुसकीची वागणूक, सन्मानाचे जीवन व आत्मनिर्भरतेकडे नेणारी दिशा देण्याचे काम काकडे सातत्याने करत आहेत. अशोक काकडे यांना मिळालेल्या या गौरवामुळे दिव्य सेवा प्रकल्पाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळणार असून मानसिक आरोग्य क्षेत्रातील सेवेला अधिक व्यापक मान्यता मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top