Mahabreaking

🔴 BREAKING
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  :बाबुराव पाटील विद्यालय लोणी गवळी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी Dr. Babasaheb Ambedkar :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषीत,वंचित घटकांना सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला: मयूर गोलेच्छा The historic Karvand Festival :बुलढाणा जिल्ह्यात करवंड येथे १५ एप्रिल रोजी  ऐतिहासिक करवंड महोत्सव Youth Foundation :युथ फाउंडेशन तर्फे निपाणा शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप Ujjwal Public School.उज्ज्वल पब्लिक स्कूलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी Rajesh Keshavrao Gavande :काँग्रेसच्या अकोला जिल्हाध्यक्षपदासाठी राजेश केशवराव गावंडे यांचे नाव आघाडीवर

The watershed festival :वाकी बुद्रुक येथे पाणलोट महोत्सव २०२५ उत्साहात

The watershed festival :पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत वाकी बुद्रुक येथे पाणलोट महोत्सव २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सवानिमित्त सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पाणलोट व जलसंधारणाबाबत जनजागृती केली.

Waki ​​Budruk.
गजानन भालेकर

धोत्रा नंदाई   : पाणलोट विकास कार्यक्रमांतर्गत वाकी बुद्रुक येथे पाणलोट महोत्सव २०२५ उत्साहात साजरा करण्यात आला. महोत्सवानिमित्त सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून पाणलोट व जलसंधारणाबाबत जनजागृती केली.

महोत्सवानिमित्त गावात राबविण्यात आलेल्या विविध पाणलोट विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये सामूहिक शेततळे, वैयक्तिक लाभाची फळबाग, डाळीचे बांध, सिमेंट नालाबांध आदी कामांचा समावेश होता. या कामांमुळे गावातील भूजल पातळी वाढण्यास मदत होत असून शेतकऱ्यांना तिन्ही हंगामात पिके घेणे शक्य होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना पाणलोट विकासाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

महोत्सवानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, वाकी बुद्रुक येथील मुख्याध्यापिका श्रीमती ढवळे मॅडम तसेच शिक्षकवृंद   मुरकुट सर,  राठोड   व   घुगे सर यांनी मोलाचे सहकार्य केले असून, त्यांनी आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावाचे सरपंच   मल्हारी पवनेर भोसले होते. प्रकल्प कार्यालयीन यंत्रणा व देऊळगाव मही येथील  अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक एकनाथराव काकड, पिराजी नागरे, भुजंगराव चेके, विजय चेके, शंकर चेके, दीपक चेके यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. कृषी विभागाकडून सहायक कृषी अधिकारी पूनम कडू, घनश्याम डोईफोडे, प्रणव वाघ, योगेश चेके, अनंता देशमुख, उप कृषी अधिकारी समाधान वाघ, शिवाजी शिंगणे तसेच डब्ल्यूडीटी उदय डोईफोडे व विशाल पवार, सरपंच  धोत्रा नंदाई  विष्णू गीते व बाळू नागरे यांनी उपस्थिती दर्शविली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top