Mahabreaking

[breaking_news]

The specter :संशयाच्या भुताने सुखी संसाराची राखरांगोळी! सैन्यदलातील जवानाचे दोन्ही संसार मोडकळीस

The specter : चारित्र्यावर संशय घेण्याच्या विकृत मानसिकतेने एका सैन्यदलातील जवानाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणे, तिच्यावर बंधने लादणे आणि मारहाण करण्याच्या प्रकारांमुळे त्याचा पहिला संसार मोडला. त्यानंतर दुसरा विवाह केल्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. परिणामी, दुसरा संसारही मोडकळीस आला असून, दोन उच्चशिक्षित तरुणींच्या वैवाहिक आयुष्याची स्वप्ने धुळीस मिळाल्याची घटना समोर आली आहे.

arrest

 पत्नीच्या चारित्र्यावर संशय, स्वतःचे मात्र शेजारणीशी संबंध; जवानाच्या दुसऱ्या संसारातही वादळ!

नागपूर : चारित्र्यावर संशय घेण्याच्या विकृत मानसिकतेने एका सैन्यदलातील जवानाचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेणे, तिच्यावर बंधने लादणे आणि मारहाण करण्याच्या प्रकारांमुळे त्याचा पहिला संसार मोडला. त्यानंतर दुसरा विवाह केल्यानंतरही त्याच्या वर्तनात बदल झाला नाही. परिणामी, दुसरा संसारही मोडकळीस आला असून, दोन उच्चशिक्षित तरुणींच्या वैवाहिक आयुष्याची स्वप्ने धुळीस मिळाल्याची घटना समोर आली आहे.

नागपुरातील एका उच्चशिक्षित कुटुंबातील संजय (काल्पनिक नाव) हा अभ्यासात हुशार होता. शिक्षणासोबतच त्याने मैदानी सरावावरही भर दिला. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काही महिन्यांतच त्याची सैन्यदलात निवड झाली. काही वर्षे नोकरी केल्यानंतर आई-वडिलांनी त्याच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. एका उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणीशी त्याचा कुटुंबीयांच्या संमतीने विवाह झाला. संबंधित तरुणी एका खासगी कंपनीत चांगल्या वेतनावर नोकरी करीत होती. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. मात्र, काही दिवसांतच संजयने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. तिने नोकरी सोडावी, अशी अट त्याने घातली. संसार टिकविण्यासाठी पत्नीने नोकरीही सोडली; मात्र तरीदेखील त्याच्या संशयी स्वभावात बदल झाला नाही.

पत्नीच्या चारित्र्यावरून वारंवार वाद घालणे, मारहाण करणे आणि तिला माहेरच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखणे, असे प्रकार सुरूच राहिले. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून पहिली पत्नी कायमची माहेरी निघून गेली आणि पहिला संसार संपुष्टात आला.

पहिला विवाह मोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी संजयने पुन्हा विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्याच्या दूरच्या नातेवाईकांमधील स्विटी (काल्पनिक नाव) या उच्चशिक्षित तरुणीचे स्थळ समोर आले. स्विटी एका शासकीय विभागात नोकरी करीत होती. दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचा विवाह झाला. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच संजयने तिच्या कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर आक्षेप घेत तिलाही नोकरी सोडण्यास भाग पाडले. कुटुंबीयांच्या दबावामुळे स्विटीनेदेखील नोकरी सोडली. त्यानंतर संजय पत्नीला घेऊन देशाच्या सीमेवरील तैनातीच्या ठिकाणी राहू लागला.

घरात बंधने, शेजाऱ्यांशी बोलण्यासही मनाई!

अन्य राज्यात स्थायिक झाल्यानंतर स्विटीच्या आयुष्यावरील बंधने वाढत गेली. कपडे कसे घालावेत, केसांची रचना कशी असावी, यापासून ते दैनंदिन वागण्यापर्यंत अनेक बाबींमध्ये तिच्यावर निर्बंध लादण्यात आले. संजय दारूच्या आहारी गेल्याने त्याच्या वर्तनात आणखी बदल झाला. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. शेजाऱ्यांशी बोलले तरी तिच्यावर संशय घेऊन मारहाण केली जात होती. एवढेच नव्हे, तर तिला घराबाहेर जाण्यासही मनाई करण्यात आली होती. त्यामुळे अनोळखी राज्यात स्विटीचे आयुष्य मानसिक आणि शारीरिक त्रासात जाऊ लागले.

पतीच्या मोबाईल तपासणीत धक्कादायक बाब उघड!

दरम्यान, स्विटीने एकदा पतीचा मोबाईल तपासला असता तिला धक्कादायक माहिती मिळाली. संजयचे शेजारी राहणाऱ्या दोन मुलांची आई असलेल्या एका विवाहित महिलेसोबत संबंध असल्याचे तिच्या निदर्शनास आले. स्वतःच्या वर्तनाबाबत जाब विचारल्यानंतरही संजयने आपली चूक मान्य करण्याऐवजी पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे.

पतीच्या संशयी स्वभावामुळे आणि सततच्या छळामुळे स्विटीने अन्य राज्यातील अनोळखी ठिकाणी जवळपास नऊ महिने अतोनात त्रास सहन केला. मात्र, अखेर सहनशीलतेचा बांध फुटल्यानंतर तिने माहेर गाठले. त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. आता दुसरा संसारही संपुष्टात आणण्याच्या तयारीत स्विटी असल्याचे समोर आले आहे.

एकीकडे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर बंधने लादायची आणि दुसरीकडे स्वतःच्या वर्तनाबाबत मात्र वेगळी भूमिका घ्यायची, अशा दुटप्पी वागणुकीमुळे दोन उच्चशिक्षित महिलांच्या वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाल्याची ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top