Mahabreaking

[breaking_news]

Family ostracized :आंतरजातीय विवाह केला म्हणून कुटुंबाला वाळीत टाकले; समाजात घेण्यासाठी पाच लाखांची मागणी!

Family ostracized : आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून एका विवाहित तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना समाजातून वाळीत टाकल्याचा, जातीवाचक अपमान केल्याचा तसेच पाच लाख रुपये दिल्याशिवाय समाजात पुन्हा प्रवेश देणार नसल्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार देऊळगाव राजा शहरातील सिव्हिल कॉलनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Left home
जातपंचायतीचा कथित मनमानी कारभार! विवाहितेसह कुटुंबाला बहिष्कृत केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा

देऊळगाव राजा : आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून एका विवाहित तरुणीसह तिच्या कुटुंबीयांना समाजातून वाळीत टाकल्याचा, जातीवाचक अपमान केल्याचा तसेच पाच लाख रुपये दिल्याशिवाय समाजात पुन्हा प्रवेश देणार नसल्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार देऊळगाव राजा शहरातील सिव्हिल कॉलनी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील फिर्यादी पल्लवी राजकुमार शिवरकर (वय २४, रा. सिव्हिल कॉलनी, देऊळगाव राजा) या बौद्ध (महार) समाजातील असून, त्यांनी वैदू समाजातील तरुणासोबत विवाह केला आहे. याच आंतरजातीय विवाहाचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना समाजातून वाळीत टाकल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपी क्रमांक एक शंकर मारोती शिवरकर याने फिर्यादीच्या भावाला फोन करून, ‘तुझ्या भावाने महार जातीतील मुलगी केली आहे, त्यामुळे तुम्हाला समाजातून वाळीत टाकले आहे,’ असे सांगितले. त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अन्य आरोपींसह संगनमत करून फिर्यादीला उद्देशून, ‘तू महार जातीची असून आमच्या वैदू समाजातील मुलासोबत लग्न का केले? त्यामुळे आम्ही तुम्हाला समाजात घेणार नाही,’ असे म्हणत वाळीत टाकल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.
इतकेच नव्हे, तर फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीचा अपमान झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी जातपंचायत भरवून पाच लाख रुपये दिल्याशिवाय संबंधित कुटुंबाला समाजात पुन्हा प्रवेश द्यायचा नाही, तसेच समाजातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांना बोलवायचे नाही, असा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय, संबंधित कुटुंबाला समाजातील कोणत्याही व्यक्तीने कार्यक्रमासाठी बोलावल्यास त्यालाही समाजातून बाहेर काढण्याची धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
या प्रकरणी पल्लवी शिवरकर यांनी दिलेल्या तोंडी तक्रारीवरून शंकर मारोती शिवरकर, पांडुरंग बाबुराव शिवरकर, तायन्ना बाबुराव शिवरकर, सिताराम एकनाथ शिवरकर, मारोती आनंदा शिवरकर, सुरेश आनंदा शिवरकर आणि अजय अंबादास शिवरकर (सर्व रा. सिव्हिल कॉलनी, देऊळगाव राजा) या सात जणांविरुद्ध कायम गुन्हा क्रमांक ५१९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०८ (३), ३५२, ३५१ (२), ३५१ (३), ३ (५), महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१६ मधील कलम ५ व ७ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमातील कलम ३ (१) (झेड-सी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर १८ नोव्हेंबर रोजी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे करीत आहेत.
आंतरजातीय विवाहाच्या कारणावरून सामाजिक बहिष्कार, आर्थिक मागणी आणि धमकावण्यासारखे गंभीर आरोप समोर आल्याने देऊळगाव राजा शहरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top