Mahabreaking

[breaking_news]

Teacher sends :शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना अश्लील फोटो अन् व्हिडिओ; नागपुरातील नामांकित कोचिंग क्लासमध्ये खळबळ!

Teacher sends : नागपुरातील एका नामांकित जेईई आणि नीट कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेल्या २५ वर्षीय शिक्षिकेने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वतःचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १३ नोव्हेंबर रोजी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर एका विद्यार्थ्याने संपर्क साधल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रासह पालकवर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

arrest

ज्ञानदानाच्या मंदिरात धक्कादायक प्रकार! शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवले अश्लील फोटो

नागपूर : नागपुरातील एका नामांकित जेईई आणि नीट कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेल्या २५ वर्षीय शिक्षिकेने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्वतःचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १३ नोव्हेंबर रोजी चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक १०९८ वर एका विद्यार्थ्याने संपर्क साधल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित शिक्षिकेविरुद्ध पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रासह पालकवर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

नागपुरातील एका नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये संबंधित २५ वर्षीय तरुणी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. या संस्थेत अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या जुलै महिन्यात शिक्षिकेने काही विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर ‘हाय’ असा संदेश पाठवून संवाद सुरू केला. विद्यार्थ्यांनीही त्याला प्रतिसाद दिल्यानंतर हळूहळू ती त्यांच्याशी अश्लील विनोद आणि आक्षेपार्ह स्वरूपाचे संदेश पाठवून संवाद साधू लागली.

यानंतर तिने काही विद्यार्थ्यांना स्वतःचे अश्लील फोटो पाठवले. विद्यार्थ्यांकडून कोणतीही तक्रार होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अश्लील व्हिडिओ पाठवण्यासही सुरुवात केली. अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर तिने स्वतःचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ पाठवल्याचे तपासात समोर आले आहे.

पालकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

एका विद्यार्थ्याच्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने दखल घेतली.

त्यानंतर चाइल्ड हेल्पलाइन पथकातील पूजा कांबळे आणि मीनाक्षी धडाडे यांनी प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली. आवश्यक माहिती आणि पुरावे संकलित करून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बाधित विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू

या प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी सांगितले की, संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे बाधित झालेल्या सर्व अल्पवयीन विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून, पडताळणीदरम्यान काही फोटो आणि व्हिडिओही आढळून आले आहेत.

शैक्षणिक संस्थांमध्ये बालसंरक्षण धोरणाची गरज

जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांनी हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगितले. अशा घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ट्युशन क्लासेस आणि शाळांमध्ये अद्याप बालसंरक्षणविषयक धोरण (चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी) प्रभावीपणे राबवले जात नाही. त्यामुळे पालकांनी अधिक सजग राहणे आणि शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top