Mahabreaking

[breaking_news]

DJ systems are banned :बोरगाव मंजूत दुर्गा विसर्जन मिरवणुकीला रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी; डीजेवर बंदी

DJ systems are banned :सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच मिरवणुकीत डीजे वाजविण्यास बंदी असून, मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूक मार्गावर रस्ते अरुंद असल्याने मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ शकतो यासाठी मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी दिले आहेत.

 न्यायालयाच्या आदेशांचे पालन करा; दुर्गा विसर्जन शांततेत पार पाडा! ठाणेदार सुनील वानखडे यांचे आवाहन

बोरगाव मंजू : सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या सांगतेनिमित्त बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या दुर्गा विसर्जन मिरवणुकीसाठी रात्री १० वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसेच मिरवणुकीत डीजे वाजविण्यास बंदी असून, मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, तसेच मिरवणूक मार्गावर रस्ते अरुंद असल्याने मोठ्या वाहनांना अडथळा निर्माण होऊ शकतो यासाठी मंडळांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे निर्देश बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे यांनी दिले आहेत. दुर्गा उत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करून विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध सार्वजनिक दुर्गा मंडळांच्या वतीने नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत भाविकांनी देवीची मनोभावे पूजा-अर्चा करून धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. नवरात्रोत्सवाची सांगता होत असताना बुधवारी, २१ ऑक्टोबर रोजी दुर्गा मंडळांच्या वतीने विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करणार असल्याने तसेच अरुंद असल्याने मिरवणुक मार्गक्रमण करीत असताना वाहतूक व्यवस्था, तसेच मिरवणूक प्रभावित होऊ नये यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मिरवणूक दरम्यान लहान वाहनांचा वापर करावा असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे

डीजेवर बंदी; वेळेच्या मर्यादेचे पालन अनिवार्य

न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजे वाजविण्यास बंदी असल्याने कोणत्याही मंडळाने नियमांचे उल्लंघन करू नये. तसेच मिरवणूक रात्री १० वाजेपर्यंतच पूर्ण करण्याच्या वेळेच्या मर्यादेचे काटेकोर पालन करावे. न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे आवश्यक असून, नियमभंग होणार नाही याची जबाबदारी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे ठाणेदार सुनील वानखडे यांनी स्पष्ट केले.

मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा नको

शहरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणूक जात असताना मोठ्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे मंडळांनी शक्यतो लहान वाहनांचा वापर करावा. मिरवणुकीचा मार्ग मोकळा राहील, नागरिकांना ये-जा करताना अडचण निर्माण होणार नाही आणि वाहतुकीत अडथळे येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

शांतता व धार्मिक सलोखा राखण्याचे आवाहन

उत्सवाच्या काळात नागरिकांनी संयम, शिस्त आणि सामाजिक सलोखा राखावा. विसर्जन मिरवणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे. पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव आनंदात आणि शांततेत पार पाडावा, असे आवाहन ठाणेदार सुनील वानखडे यांनी केले.

या बैठकीला शांतता समितीचे सदस्य तसेच नवदुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. दुर्गा मंडळे आणि नागरिकांच्या सहकार्याने विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, अशी अपेक्षा पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top