Senior Citizens: महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), मुंबई तसेच बुलढाणा प्रादेशिक विभाग (विदर्भ) यांच्याशी संलग्न असलेल्या राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघटना, शाखा देऊळगाव राजा या संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रा. विनायकराव कुळकर्णी, तर सचिवपदी गोविंदराव बोरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघटना सक्रिय होणार; देऊळगाव राजा येथे नवीन कार्यकारिणी जाहीर
गजानन तिडके
देऊळगाव राजा : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), मुंबई तसेच बुलढाणा प्रादेशिक विभाग (विदर्भ) यांच्याशी संलग्न असलेल्या राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघटना, शाखा देऊळगाव राजा या संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी प्रा. विनायकराव कुळकर्णी, तर सचिवपदी गोविंदराव बोरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी मधुकरराव शेळके, उपाध्यक्षपदी मल्लिकार्जुन लंगोटे व काशिनाथ खांडेभराड, तर कोषाध्यक्षपदी अरुण सपाटे यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून बळीराम मापारी, प्रा. अशोकराव डोईफोडे, घनश्याम भंडारे, प्रकाश अहिरे, राम चौधरी, रमेश नरोडे, अनिल कुळकर्णी, प्रा. विजय रायमूल, रामदास भोलणकर, सतीश कुळकर्णी आणि आशाताई शेळके यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ मार्गदर्शक गोविंदराव अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
नवनियुक्त कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. यावेळी संघटनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी संघटना सक्रियपणे कार्य करेल, अशी ग्वाही नवनियुक्त अध्यक्ष प्रा. विनायकराव कुळकर्णी यांनी दिली.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

