Mukul Wasnik : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी शनिवारी संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथे भेट देऊन दिवंगत काँग्रेस नेते तथा माजी पंचायत समिती सभापती भारतसिंग भाटिया यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी भाटिया कुटुंबीयांची विचारपूस करून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

दिवंगत भारतसिंग भाटिया यांच्या कुटुंबीयांचे मुकुल वासनिक यांनी केले सांत्वन
संग्रामपूर : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी शनिवारी संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी येथे भेट देऊन दिवंगत काँग्रेस नेते तथा माजी पंचायत समिती सभापती भारतसिंग भाटिया यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी भाटिया कुटुंबीयांची विचारपूस करून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
काँग्रेस पक्षाशी निष्ठा राखून कार्य करणारे दिवंगत भारतसिंग भाटिया यांच्या निमखेडी येथील निवासस्थानी मुकुल वासनिक यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राहुल बोंद्रे, कृष्णराव इंगळे, रामविजय बुरुंगलै, स्वाती वाकेकर, अताऊल्ला पठाण, नक्कलसिंग भाटिया आदी उपस्थित होते.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

