Mahabreaking

[breaking_news]

Lord Ganesha :  ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने साखरखेर्डा दुमदुमला; गुलाल, पुष्पवृष्टीत गणरायाला निरोप

Lord Ganesha : अनंत चतुर्दशीनिमित्त साखरखेर्डा येथे श्री गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्या. बालगोपाल गणेश मंडळासह सार्वजनिक आठ गणेश मंडळांच्या श्रींचे गुलाल व पुष्पवृष्टी करीत वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे शांततेत विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Lord Ganesha

बालगोपालांसह आठ गणेश मंडळांच्या श्रींचे शांततेत विसर्जन; साखरखेर्ड्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त

साखरखेर्डा : अनंत चतुर्दशीनिमित्त साखरखेर्डा येथे श्री गणेश विसर्जन मिरवणुका उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडल्या. बालगोपाल गणेश मंडळासह सार्वजनिक आठ गणेश मंडळांच्या श्रींचे गुलाल व पुष्पवृष्टी करीत वाजत-गाजत मिरवणुकीद्वारे शांततेत विसर्जन करण्यात आले. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ या गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Lord Ganesha

बालगोपाल मंडळाची शिस्तबद्ध मिरवणूक

सकाळी ९ वाजल्यापासून बालगोपाल गणेश मंडळाच्या पुढाकाराने श्री गणेशाच्या मूर्तीची भक्तिभावाने मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १ वाजेपर्यंत या मंडळाचे विसर्जन पूर्ण झाले. विशेष म्हणजे, मिरवणुकीदरम्यान ये-जा करणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, याची बालगोपाल मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष काळजी घेतली.

बालगोपाल गणेश मंडळात सुमारे दहा मंडळे सहभागी झाली होती. या मिरवणुकीत डीजे किंवा मोठ्या आवाजाच्या ध्वनिव्यवस्थेऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली. विशेष म्हणजे या मिरवणुकीसाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता भासली नाही.

दुपारी दोन वाजता मुख्य मिरवणुकीला प्रारंभ

दुपारी २ वाजता संत संताजी जगनाडे महाराज चौकातून सार्वजनिक गणेश मंडळांच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. महात्मा ज्योतिबा फुले गणेश मंडळ अग्रस्थानी होते. त्यानंतर अहिल्याबाई होळकर गणेश मंडळ, परदेशी गणेश मंडळ, बालनाथ गणेश मंडळ, श्री शिवाजी व्यायाम शाळा गणेश मंडळ, संत रोहिदास गणेश मंडळ, हिंदू सूर्य महाराणा प्रताप गणेश मंडळ आणि श्री शिवाजी हायस्कूल गणेश मंडळ या मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.

यातील अनेक गणेश मंडळांनी डीजेचा वापर टाळत पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीत सहभाग नोंदविला. महात्मा ज्योतिबा फुले गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लाठी-काठीवरील खेळाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

भोगावती नदीकाठी गणरायाला भावपूर्ण निरोप

संत संताजी जगनाडे महाराज चौकातून सुरू झालेली विसर्जन मिरवणूक दगडी मस्जिद, गुजरी चौक, गणपती चौक, अहिल्याबाई होळकर नगर, रोहिलपुरा आणि महात्मा ज्योतिबा फुले नगर या मार्गाने पुढे जात भोगावती नदीकाठी पोहोचली. तेथे गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यात आले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाने चोख नियोजन केले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबू पथक, एसआरपी पथक, राखीव पोलीस दल, स्थानिक पोलीस तसेच होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पोलिसांच्या नियोजनासोबतच गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सहकार्य केल्याने विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top